शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
3
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
4
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
5
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
6
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
7
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ मोठा स्फोट
8
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
9
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
10
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
11
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
12
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
13
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
14
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
15
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
16
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
17
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
18
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
19
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
20
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...

बजेटवर मोदींची छाप

By admin | Updated: February 29, 2016 04:50 IST

‘१२५ कोटी भारतीय उद्या माझी परीक्षा घेणार आहेत व या परीक्षेत मी नक्कीच यशस्वी होईन,’ असे ‘आकाशवाणी’वरील ‘मन की बात’ या कार्यक्रमात देशवासीयांना सांगून उद्या (सोमवारी) संसदेत सादर केल्या

हरीष गुप्ता, नवी दिल्ली‘१२५ कोटी भारतीय उद्या माझी परीक्षा घेणार आहेत व या परीक्षेत मी नक्कीच यशस्वी होईन,’ असे ‘आकाशवाणी’वरील ‘मन की बात’ या कार्यक्रमात देशवासीयांना सांगून उद्या (सोमवारी) संसदेत सादर केल्या जाणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पावर आपली गडद छाप असेल, असे स्पष्ट संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दिले. पंतप्रधानांचे राजकीय आणि आर्थिक अग्रक्रम अर्थसंकल्पातून प्रतिबिंबित होतच असतात व ते रास्तही आहे. पण अर्थसंकल्प ही व्यक्तिश: आपली परीक्षा असल्याचे जाहीर वक्तव्य करणारे मोदी हे पहिलेच पंतप्रधान आहेत.आता माझ्या सरकारला दोन वर्षे झाली आहेत व बराच अनुभव आता माझ्या गाठीशी आला असल्याने या वेळच्या माझ्या अर्थसंकल्पाकडे देशवासीयांनी जरा अधिक गांभीर्याने पाहावे, असेच मोदींनी यातून सूचित केले आहे. देशाच्या वित्तीय स्थितीचे सर्व बारकावे आता मोदींच्या पल्ल्यात आले आहेत व परिस्थितीवर त्यांची घट्ट पकड बसली आहे, हेही त्यांच्या विधानावरून स्पष्ट होते. कर संकलन वाढविण्यासाठी आणि आगामी काळात वस्तू व सेवा कर प्रणाली लागू होण्याच्या अनुषंगाने सेवा कराच्या मूल्यात सध्याच्या १४.५ टक्क्यांवरून १६ टक्के अशी वाढ करण्याची घोषणा अर्थसंकल्पाद्वारे केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली करतील, अशी दाट शक्यता आहे. यामुळे स्वाभाविकच भाववाढ होईल अशी अपेक्षा आहे. एकीकडे सेवा कराचा दर वाढविण्याचे संकेत मिळत असतानाच दुसरीकडे सध्या सेवा कराची मर्यादा वाढविण्याचाही प्रस्ताव विचाराधीन आहे. सध्या १० लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या व्यावसायिकाला सेवा कर माफ आहे. १० लाखांच्या पुढे सेवा कर भरावा लागतो. पण आता ही मर्यादा प्रति वर्ष २५ लाख रुपये होईल असे मानले जात आहे. मोदींची परीक्षामोदी आणि जेटलींसमोर सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी, वन रँक वन पेन्शन आणि वसूल न होणाऱ्या कर्जाने त्रस्त झालेल्या बँका हे मोठे आव्हान उभे ठाकल्यामुळे साहजिकच कठोर उपाययोजनांचीही गरज आहे. बहुतेक यामुळेच मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये ‘उद्या माझीही परीक्षा आहे’ असा मुद्दाम उल्लेख केला असावा.मोदींनी तत्पूर्वी अर्थमंत्रालयाकडून काही प्रस्ताव, योजनाही मागितल्या. अर्थात, विकासासाठी निधी उपलब्ध करण्याचे कठीण काम मोदींना करायचे आहे. त्याचबरोबर महागाई रोखणे आणि ग्रामीण भागातील आर्थिक ताणतणाव कमी करणे, अशी आव्हानेही त्यांच्यासमोर उभी आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडी-२च्या (एनडीए-२) या अर्थसंकल्पाचा चांगला भाग असा की पंतप्रधान आणि अर्थमंत्री यांच्यातील अतिशय उत्तम म्हणता येईल असे जुळलेले सूर. असे जुळलेले सूर पूर्वी एकदाच बघायला मिळाले होते ते म्हणजे पी.व्ही. नरसिंह राव आणि त्यांचे अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांच्यातील. अनेक सुधारणा राव व सिंग यांनी पाच वर्षांत केल्या; परंतु पूर्ण बहुमत असूनही मोदी व जेटली यांचा संघ गेल्या दोन वर्षांत संसदेतील कोंडीतच अडकून पडला आहे.