नवी दिल्ली : ब्राझीलच्या अध्यक्ष दिलमा रौसेफ यांनी फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना बघण्यासाठी निमंत्रण दिले असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यावेळी उपस्थित राहू शकणार नाहीत, असे विदेश मंत्रलयाने बुधवारी स्पष्ट केले.
मोदी 15 ते 17 जुलैदरम्यान होणा:या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी फोर्टालेझा येथे उपस्थित राहतील. विश्वचषकाचा अंतिम सामना रिओ डी जिनेरो येथे 13 जुलै रोजी होत आहे. ब्रिक्स परिषद लगेच होणार असल्यामुळे सदस्य राष्ट्रांच्या प्रमुखांना सामना बघण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. गेल्याच आठवडय़ात रौसेफ यांनी मोदींना निमंत्रण पाठविले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)