शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मोदींची ब्रिटन दौऱ्यात महाराणीसोबत मेजवानी

By admin | Updated: November 1, 2015 02:42 IST

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी १२ ते १४ नोव्हेंबरदरम्यान ब्रिटनच्या पहिल्याच सरकारी दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते ब्रिटिश संसदेच्या दोन्ही सभागृहांत भाषण करतील आणि

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी १२ ते १४ नोव्हेंबरदरम्यान ब्रिटनच्या पहिल्याच सरकारी दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते ब्रिटिश संसदेच्या दोन्ही सभागृहांत भाषण करतील आणि महाराणी एलिझाबेथ यांच्यासमवेत बकिंगहॅम राजवाड्यात मेजवानीत सहभागी होतील.गोध्राकांडानंतर गुजरातेत झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेपाठोपाठ ब्रिटननेही मोदींना प्रवेश नाकारला होता. आता त्या घटनेला बरेच दिवस उलटून गेले असून, पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. तोच ब्रिटन आता पंतप्रधानांचे भव्य स्वागत करण्यास सज्ज झाला आहे. या दौऱ्यात ऐतिहासिक विम्ब्ले स्टेडियमवर त्यांचा भव्यदिव्य कार्यक्रम होणार आहे. ते अनेक राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेतील आणि हाऊस आॅफ कॉमन्स व हाऊस आॅफ लॉर्डस् या संसदेच्या दोन्ही सभागृहांत भाषण करतील. १२ नोव्हेंबरला त्यांचा दौरा सुरू होणार असून, १३ नोव्हेंबरला ते महाराणी एलिझाबेथ यांच्यासोबत मेजवानीत सहभागी होतील. १२ नोव्हेंबरला ते १०, डाऊनिंग स्ट्रीट येथे ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांच्याशी चर्चा करतील. अफगाण-पाकिस्तानातील स्थिती, इसिसचा वाढता प्रभाव, आंतरराष्ट्रीय दहशतवादाविरुद्ध लढा यांचा चर्चेत समावेश असण्याची शक्यता आहे.मोदी या दौऱ्यावर असताना तेथील संसदेचे अधिवेशन चालू राहणार नाही; मात्र त्यांच्यासाठी संसदेचे खास अधिवेशन बोलावण्यात आले आहे. त्यातच मोदी भाषण करतील. यापूर्वी नेपाळ, श्रीलंका, फिजी, आॅस्ट्रेलिया या देशांच्या दौऱ्यावर असताना त्यांनी अशाच प्रकारे तेथील संसदेत भाषणे केली होती.२००६ साली भारताचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी ब्रिटनला भेट दिली होती. त्यानंतर गेल्या १० वर्षांत ब्रिटनला जाणारे मोदी हे भारताचे पहिलेच पंतप्रधान होणार आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)