शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या पदव्या भाजपाने केल्या जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2016 03:22 IST

भारतीय जनता पार्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बीए आणि एमएची पदवी जाहीर केली असली तरी या मुद्द्यावरून सुरू झालेला राजकीय संघर्ष संपायला तयार नाही.

नितीन अग्रवाल, नवी दिल्लीभारतीय जनता पार्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बीए आणि एमएची पदवी जाहीर केली असली तरी या मुद्द्यावरून सुरू झालेला राजकीय संघर्ष संपायला तयार नाही. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पदव्यांबाबत केलेले आरोप भाजपाने बिनबुडाचे असल्याचे म्हटले आहे तर आम आदमी पार्टीने या पदव्या बनावट असल्याचा आरोप केला आहे.मोदी यांच्या शैैक्षणिक पात्रतेवर केजरीवाल यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला भाजपाने उत्तर दिले. पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी केजरीवाल यांनी मोदी यांच्यावर आरोप करून राजकारणाची सीमा ओलांडली असल्याची टीका केली. ते म्हणाले, ‘‘दिशाभूल केल्याबद्दल केजरीवाल यांनी क्षमा मागावी. आरोप कशाच्या आधारावर करीत आहोत हे केजरीवाल यांनी सांगावे.’’ त्याआधी शाह म्हणाले होते की, ‘‘मोदी यांनी दिल्ली विद्यापीठातून बीए आणि एमएची (राज्यशास्त्र) पदवी गुजरात विद्यापीठातून मिळविली. पंतप्रधानांच्या शैैक्षणिक पात्रतेवरून पत्रकार परिषद घ्यायची वेळ यावी ही दुर्दैवी बाब आहे. गेल्या काही दिवसांत पदव्यांवरून केजरीवाल यांनी चुकीची विधाने केली आहेत. मी बीए आणि एमएची पदवी सार्वजनिक करीत आहे.’’ या दोन्ही पदव्यांच्या प्रती शाह यांनी प्रसारमाध्यमांसमोर सादर केल्या.शाह यांच्यासोबत उपस्थित असलेले अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले की, ‘‘१९७८मध्ये पंतप्रधान दिल्ली विद्यापीठात परीक्षा द्यायला यायचे. ते तेव्हा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यालयात थांबत. त्या वेळी त्यांचा लोकांशी जास्त संपर्क नव्हता; परंतु अभाविपचा अध्यक्ष या नात्याने ते अनेकवेळा माझ्या संपर्कात आले.’’

> आप म्हणते, भाजपाने दाखविली मोदींची बनावट पदवी! भाजपाने मोदी यांच्या दाखविलेल्या पदव्या या बनावट असून, देशाची दिशाभूल करणाऱ्या असल्याची टीका आम आदमी पार्टीने केली. आपचे प्रवक्ते आशुतोष म्हणाले की, एका पदवीवर नरेंद्रकुमार दामोदरदास मोदी लिहिले व एमएच्या पदवीवर नरेंद्र दामोदरदास मोदी लिहिले आहे. आशुतोष म्हणाले की, नाव बदलण्यास शपथपत्र द्यावे लागते. अमित शाह यांनी ते शपथपत्रही सादर करायला हवे. आशुतोष यांच्या म्हणण्यानुसार, गुणपत्रिका १९७७मध्ये दिली गेली तर पदवीवर १९७८ लिहिले आहे. त्यांनी ही पदवी बनावट असल्याचे म्हटले. मोदी यांना वाचविण्यासाठी शाह आणि जेटली यांनीच फेरफार केला.