शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

मोदींनी घेतलेला निर्णय अचूक, राहुल गांधींकडून मोदींचं कौतुक

By admin | Updated: September 30, 2016 13:02 IST

पाकिस्तानवर करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर सर्व राजकीय पक्षांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक होत असताना आता काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीदेखील मोदींची स्तुती केली आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 30 - पाकिस्तानवर करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर सर्व राजकीय पक्षांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक होत असताना आता काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीदेखील मोदींची स्तुती केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेला निर्णय अचूक असल्याचं सांगत राहुल गांधींनी पाकिस्तानविरोधात करण्यात आलेल्या कारवाईचं समर्थन केलं. 
 
'मी आणि माझा पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोबत आहोत. त्यांनी जे काही केलं ते योग्य आहे. नरेंद्र मोदींनी घेतलेला निर्णय अचूक असून अडीच वर्षात मोदींनी पहिल्यांदा पंतप्रधान पदाला शोभणारा निर्णय घेतला असल्याचं', राहुल गांधी बोलले आहेत. 
 
भारताने पाकिस्तानमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर एकीकडे भारतामध्ये आनंदाचं उत्साहाचं वातावरण असताना पाकिस्तानमध्ये मात्र तणाव आहे. भारतीय लष्कर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं  सर्व राजकीय नेते, बॉलिवूड कलाकार, खेळाडू कौतुक करत असताना पाकिस्तानी क्रिकेटर शाहिद अफ्रिदीनेदेखील प्रतिक्रिया दिली आहे. 'पाकिस्तान शांतताप्रिय देश आहे. ज्या गोष्टींवर चर्चा केली जाऊ शकते त्यासाठी एवढं मोठं पाऊल उचलण्याची गरज काय? पाकिस्तानला सगळ्यांसोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवायचे आहेत. जेव्हा दोन शेजारी देश भांडतात, तेव्हा दोन्ही देशांचं नुकसान होतं', असं ट्विट शाहिद अफ्रिदीने केलं आहे. 
 
उरी हल्ल्याच्या पार्श्वभुमीवर पाकिस्तानची विविध मार्गांनी कोंडी केल्यानंतर भारताने बुधवारी मध्यरात्री जम्मू काश्मीरमधील नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले करुन 38 दहशतवाद्यांचा खात्मा केला. हेलिकॉप्टरच्या मदतीने लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे सात लाँच पॅड उद्ध्वस्त केले. त्यात पाकचे 9 सैनिकही ठार झाल्याचे सांगण्यात येत असले तरी पाकने दोनच सैनिक मारले गेल्याचे म्हटले आहे.