शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणूक निकाल 2019 : मोदींच्या देशव्यापी विजयात बिहारचीही साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 03:22 IST

नितीशकुमार, रामविलास पासवान व सुशीलकुमार मोदी यांनी विकासाचा मुद्दा चर्चेत ठेवून खेचून आणली विजयश्री

- सुमंत अयाचितपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या देशव्यापी विजयाला ‘विकासपुरुष’ नितीशकुमार व रामविलास पासवान यांच्या बिहारने जबरदस्त साथ दिली. एकूण ४० जागा असलेल्या बिहारकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले होते.

केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद (पाटणासाहिब), राधामोहन सिंह (पूर्व चंपारण), गिरीराज सिंह (बेगूसराय), आर. के. सिंह (आरा) व अश्विनीकुमार चौबे (बक्सर) मैदानात उतरले होते. या सर्वांनी यश मिळविले असले, तरी अन्य एक केंद्रीय मंत्री रामकृपाल यादव हे पाटलीपुत्रमधून पिछाडीवर गेले. लालूप्रसाद यादव यांच्या कन्या मीसा भारती यांनी तेथे विजयश्री खेचून आणली. किशनगंज जागेवरून काँग्रेसचे मोहम्मद जावेद यांनी यश मिळविले. रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टीने सहा जागा लढविल्या होत्या व सर्व जागा त्यांनी राखल्या आहेत. विरोधकांतील दिग्गज नेते शरद यादव (मधेपुरा), अभिनेते शत्रुघ्न सिन्हा (पाटणासाहिब), लोकसभेच्या माजी अध्यक्ष मीराकुमार (सासाराम), जेएनयू विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैय्या कुमार (बेगूसराय), रालोसपा प्रमुख उपेंद्र कुशवाह (काराकाट), विकासशील इन्सान पार्टीचे प्रमुख मुकेश साहनी (खगडिया) व हम (एस) प्रमुख जितनराम मांझी यांच्या कारकिर्दीला धक्का दिली. भाजपने येथे १७ जागा लढविल्या होत्या. कमकुवत विरोधक विरुद्ध सशक्त सत्ताधारी अशीच ही निवडणूक झाली.

टीआरएसचा गड आला पण सिंह गेला...तेलंगणामध्ये सर्वाधिक जागा जिंकून तेलंगणा राष्ट्र समितीने आपला गड राखला, तरी टीआरएसचे सर्वेसर्वा मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची कन्या कविता यांना निजामाबादमधून पराभव झाला. त्यामुळे गड आला पण सिंह गेला, अशी स्थिती केसीआर यांची झाली.लोकाभिमुख योजनांचा पॅटर्न उभा करणाऱ्या सत्तारुढ तेलंगणा राष्ट्रसमितीला या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. देशातील सर्वाधिक उमेदवारांची संख्या असलेली लक्षवेधी लढत निजामाबादमध्ये झाली. यात एआयएमआयएमचे प्रमुख खा. डॉ. असुदोद्दीन ओवेसी यांनी विजय मिळविला.

टॅग्स :Bihar Lok Sabha Election 2019बिहार लोकसभा निवडणूक निकाल 2019