मोदींनी घेतला मंत्र्यांचा क्लास
By admin | Updated: June 3, 2014 00:59 IST
सुशासनासाठी एकोप्याने काम करण्याचा सल्ला
मोदींनी घेतला मंत्र्यांचा क्लास
सुशासनासाठी एकोप्याने काम करण्याचा सल्लानवी दिल्ली : सुशासनासाठी एकोप्याने काम करणे आणि जनतेपर्यंत लाभ पोहोचविण्याच्या उद्देशाने कामाची कालबद्ध अंमलबजावणी करण्याचा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी आपल्या मंत्रिमंडळातील सदस्यांना दिला.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदींनी संपूर्ण मंत्रिमंडळाची प्रदीर्घ बैठक घेतली. सर्व ४५ मंत्री आणि त्यांच्या मंत्रालयाने देशाच्या विकासासाठी सामूहिक शक्तीसह एकत्रितपणे काम केले पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला.पंतप्रधानांच्या निवासस्थानी तब्बल तीन तासपर्यंत ही बैठक चालली. या बैठकीत मोदींनी अर्थव्यवस्था गतिमान करणे, अधिक गुंतवणूक आणि पायाभूत सोईसुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या संदर्भात विचारांची देवाण-घेवाण केली. याआधीच्या संपुआ सरकारने सुरू केलेल्या अनेक योजना व कार्यक्रमांच्या प्रगतीचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही मोदींनी आपल्या मंत्र्यांना या बैठकीत दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.या बैठकीत सरकारचा १०० दिवसांचा अजेंडा हाच चर्चेचा केंद्रबिंदू होता. यावेळी मोदींनी मंत्र्यांकडून सूचनाही मागितल्या. मोदींच्या दशसूत्री अजेंड्यांच्या पार्श्वभूमीवर आजची बैठक आयोजित करण्यात आली होती. (वृत्तसंस्था)