शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
3
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
4
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
5
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
6
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
7
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
8
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
9
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
10
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
11
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
12
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
13
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
14
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
15
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
16
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
17
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
18
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
19
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
20
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...

मोदींच्या मंत्रिमंडळानं घेतले ६ मोठे निर्णय, कोलकाता बंदराला दिलं श्यामा प्रसाद मुखर्जींचं नाव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2020 19:24 IST

50 वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असलेल्या शेतक-यांच्या मागण्या सरकारने पूर्ण केल्या आहेत.

नवी दिल्लीः कोरोनाच्या संकटात आज मोदींच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली असून, या बैठकीत सहा मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. या सहा मोठ्या निर्णयांमध्ये तीन निर्णय हे शेतकऱ्यांशी संबंधित आहेत. आता देशातील शेतकर्‍यांना एक देश एक बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना थेट आपला माल कंपन्यांना विकता येणार आहे. तसेच अत्यावश्यक वस्तू कायदा, APAC कलमातील सुधारणांना मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयाबद्दल माहिती देताना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, शेतीसंदर्भात ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले आहेत. 50 वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असलेल्या शेतक-यांच्या मागण्या सरकारने पूर्ण केल्या आहेत.आज वन नेशन, वन मार्केटला मान्यता देण्यात आली आहे. देशात कृषी उत्पादनाची कमतरता नाही आणि म्हणून अशा वेळी त्यावर बंधणं आणणाऱ्या कायद्याची आवश्यकता नाही. या कायद्यानं गुंतवणुकीला रोखून धरलं होतं. त्यामुळे निर्यात वाढली नाही. सरकारच्या या निर्णयामुळे शेतक-यांना चांगली किंमत मिळेल. कंपन्यांना आता शेतकऱ्यांकडून थेट माल खरेदी करता येणार आहे. विशेष म्हणजे खरेदी-विक्रीवर कोणत्याही प्रकारचा कर आकारला जाणार नाही. जेव्हा जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते किंवा जास्त महागाई वाढते, त्यामुळे अशा काळात बंधणं गरजेची नसतात. शेतकर्‍यांच्या मालाला चांगला दर मिळावा यासाठी पुरेसे पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी केंद्रीय कायदा तयार केला जाईल.अत्यावश्यक वस्तू कायद्यात मोदी सरकारनं सुधारणा केली आहे. अत्यावश्यक वस्तू कायद्यात बदल करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. या कायद्यांतर्गत ज्या वस्तू येतात, त्यांची विक्री, किंमत, पुरवठा आणि वितरण यावर केंद्र सरकार नियंत्रण ठेवते. ते त्याची जास्तीत जास्त किरकोळ किंमत (एमआरपी) ठरवते. प्रकाश जावडेकर पुढे म्हणाले की, आता शेतकरी आपले उत्पादन कोठेही विकू शकतो. शेतक-यांना जास्त किमतीत धान्य विकायला दिले जाणार आहे. वाणिज्य व उद्योगाबाबतही निर्णय घेण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. जगातील कंपन्यांची अवस्था आम्हाला माहीत आहे. एम्पॉवर्ड ग्रुप ऑफ सेक्रटरीजची स्थापना करण्यात आली असून, भारतामध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक केली जाणार आहे आणि प्रत्येक मंत्रालयात एक प्रकल्प विकास कक्ष स्थापणार असल्याचीही त्यांनी घोषणा केली आहे. यामुळे भारतात गुंतवणूक करणे अधिक सुलभ होईल. तसेच अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि रोजगाराच्या संधीही उत्पन्न  होतील. कोलकाता बंदराला आता श्यामा प्रसाद मुखर्जी असे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींनी 11 जानेवारी रोजीच याची घोषणा केली होती. सहाव्या निर्णयावर ते म्हणाले की, आयुष मंत्रालयांतर्गत भारतीय औषध व होमिओपॅथीसाठी फार्माकोपिया(पीसीआयएम आणि एच) आयोगाच्या स्थापनेस मान्यता देण्यात आली आहे.

हेही वाचा

Cyclone Nisarga:निसर्ग चक्रीवादळाचा रेल्वेलाही फटका; एकही श्रमिक ट्रेन धावली नाही

गुजरातमध्ये केमिकल फॅक्टरीत स्फोट; पाच जणांचा मृत्यू, ३२ जखमी

Cyclone Nisarga: चक्रीवादळ अलिबागच्या किना-यावर धडकले; पुढचे २-३ तास महत्त्वाचे- बाळासाहेब थोरात 

मोदींच्या मंत्रिमंडळाची दोन अध्यादेशांना मंजुरी; शेतकऱ्यांसाठी 'एक देश एक बाजार' धोरण 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्या