शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
4
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
5
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
6
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
7
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
8
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
9
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
10
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
11
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
12
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
13
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
14
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
15
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
16
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
17
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
18
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
19
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
20
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
Daily Top 2Weekly Top 5

मोदींवर बहिष्कारास्त्र

By admin | Updated: August 21, 2014 02:29 IST

पंतप्रधान मोदी यांच्या कार्यक्रमांना हजर राहून भाजपाच्या जाळ्य़ात फसू नये, असा सल्ला काँग्रेस पक्षाच्या ‘स्वाभिमानी’ मुख्यमंत्र्यांना दिला.

अपमान करू न घेऊ नका : काँग्रेसचा मुख्यमंत्र्यांना सल्ला 
शीलेश शर्मा - नवी दिल्ली
राज्याचा मुख्यमंत्री विरोधी पक्षाचा असला तरी राजशिष्टाचार म्हणून त्यांना पंतप्रधानांच्या कार्यक्रमांना जावे लागते. मात्र याचा गैरफायदा घेऊन खासकरून जेथे विधानसभा निवडणुका व्हायच्या आहेत अशा राज्यांमध्ये पंतप्रधानांच्या कार्यक्रमांच्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना अपमानित करण्याची पद्धतशीर राजकीय मोहीम भाजपाने आखली असल्याचा आरोप काँग्रेसने बुधवारी केला आणि पंतप्रधान मोदी यांच्या कार्यक्रमांना हजर राहून भाजपाच्या जाळ्य़ात फसू नये, असा सल्ला पक्षाच्या ‘स्वाभिमानी’ मुख्यमंत्र्यांना दिला.
गेल्या आठवडय़ात मोदी हरियाणात गेले तेव्हा तेथील कार्यक्रमांमध्ये भाजपा कार्यकत्र्यानी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुडा यांची टर उडवून त्यांना बोलूही दिले नव्हते. त्यानंतर हुडा यांनी मोदींच्या कार्यक्रमांना यापुढे हजर न राहण्याचे जाहीर केले. मोदी गेल्या शनिवारी पॉवर ग्रीडच्या कार्यक्रमास  सोलापूरला आले तेव्हा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही काहीसा तसाच अनुभव आला. तेथे तर खुद्द मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना जाहीरपणो टोमणो मारले होते. या पाश्र्वभूमीवर काँग्रेस पक्षाने वरीलप्रमाणो भूमिका घेतली आहे. काँग्रेसने अशा घटना म्हणजे पंतप्रधान मोदी व भाजपाचे षड्यंत्र असल्याचे सांगून विरोधी पक्षांच्या आत्मसन्मान असलेल्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांच्या राजकीय कार्यक्रमात सहभागी होऊ नये, असा सल्ला दिला. या घटनांमागे राजकीय मनसुबे आहेत. मोदींनी विधानसभा निवडणुका असलेल्या जम्मू-काश्मीर, महाराष्ट्र, हरियाणासारख्या राज्यांचा दौरा केला आहे. तसेच ते गुरुवारी झारखंडच्या दौ:यावर आहेत, असे काँग्रेसचे सरचिटणीस आणि हरियाणाचे प्रभारी शकील अहमद म्हणाले. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी दक्ष राहायला हवे, असेही ते म्हणाले.
 
प्रतिनिधी पाठवणार 
 भाजपाचे सरकार केंद्रात सत्तेत आल्यापासून दिल्ली आणि काँग्रेसशासित राज्ये यांच्यात संघर्ष होत आहेत. सोलापूरमध्ये दोन दिवसांपूर्वी आपण नरेंद्र मोदी यांच्यासमवेत कार्यक्रमाला गेलो असता तेथेही अनुचित प्रकार घडला. तो दुर्दैवी होता आणि राजकीय उद्देशाने प्रेरित होता, असे स्पष्ट मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. केंद्रीय नगरविकास मंत्रलयाने नागपुरातील कार्यक्रमाचे आमंत्रण बुधवारी दुपारी आपल्याला पाठवले, प्रोटोकॉल म्हणून शासनाचे प्रतिनिधी उपस्थित राहतील; मी मात्र जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.   
 
नागपूर मेट्रोच्या भूमिपूजनास मुख्यमंत्री चव्हाण जाणार नाहीत 
1काँग्रेसशासित राज्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होत असलेल्या कार्यक्रमांमध्ये देशाच्या सांघिक भावनेला तडा जात असल्याचा गंभीर आरोप करीत नागपुरात गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असलेल्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या भूमिपूजन सभारंभाला आपण उपस्थित राहणार नाही, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले.                                  
2पुणो मेट्रोचा प्रस्ताव हा नागपूर मेट्रोच्या आधीचा असतानाही केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर मेट्रोला प्राधान्य दिले, अशी टीका होत आहे. याबाबत विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले की, गडकरी हे नागपूरचे लोकप्रतिनिधी असले तरी ते केंद्रात मंत्री आहेत. त्यामुळे प्रादेशिक भेदभाव त्यांनी करू नये, अशी अपेक्षा आहे. पुणो मेट्रोला राज्य शासनाने ऑक्टोबर 2क्13 मध्ये मंजुरी दिली होती. त्यानंतर 3 महिन्यांनी नागपूर मेट्रोचा प्रस्ताव सादर झाला होता. त्यालाही मंजुरी देण्यात आली. 
3केंद्रीय नगरविकास मंत्रलयाने दोन्ही प्रकल्पांना 8 फेब्रुवारी 2क्14 रोजी मान्यता दिली होती. असे असताना केवळ नागपूरचा प्रस्ताव पुढे नेला जात आहे. याबद्दल आपण गडकरी यांच्याकडे काल पुणो विमानतळावर भेट झाली असता तक्रार नोंदविली. पुण्याच्या प्रकल्पात काही त्रुटी आहेत आणि नागपूरचा पाठपुरावा आपण केला, असे गडकरी यांनी आपल्याला सांगितले, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. 
 
कुलाबा ते अंधेरी सीप्झ अशा भुयारी मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे भूमिपूजन येत्या दोन दिवसांत केले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. 
 
या प्रकल्पाला डॉ. मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात मान्यता मिळाली होती. प्रकल्पावर 23 ते 25 हजार कोटी रुपये खर्च येणार आहे.  
 
या अन् ठासून भाषण द्या..
नागपूर मेट्रोसाठी मुख्यमंत्र्यांनी खूप परिश्रम घेतले आहेत. त्यामुळे 
त्यांनी या कार्यक्रमाला यावे व मोदींसमक्ष या प्रकल्पाची मुहूर्तमेढ आम्ही रोवली असे ठासून सांगावे, असे काँग्रेस नेत्यांचे मत आहे.