शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

पाटीदार समाजाला चुचकारण्याचा मोदींचा प्रयत्न

By admin | Updated: April 17, 2017 14:54 IST

आजपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमधील दौ-याला सुरुवात झाली आहे.

 ऑनलाइन लोकमत 

अहमदाबाद, दि. 17 -  आजपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमधील दौ-याला सुरुवात झाली आहे. सर्वप्रथम पंतप्रधानांनी सोमवारी सकाळी सूरतमध्ये मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे उदघाटन झाले. पाटीदारांचे वर्चस्व असलेल्या ट्रस्टने हे हॉस्पिटल बांधले आहे. सध्या हा समाज भाजपावर नाराज असून, नोकरी, शिक्षणामध्ये आरक्षणाची मागणी करत आहे. 
 
हिंदीमध्ये बोलायचे की, गुजरातीमध्ये याबद्दल माझी द्विधामनस्थिती होती. पण तुम्ही इतके मोठे कार्य केले आहे की, ते संपूर्ण देशाला कळले पाहिजे त्यामुळे मी हिंदीमध्ये बोलतो असे पंतप्रधान नरेंद्र मोदी रुग्णालयाच्या उदघाटना प्रसंगी म्हणाले. दक्षिण गुजरातमध्ये डायमंड पॉलिशिंग युनिट तसेच अन्य प्रकल्पांचे उदघाटन मोदींच्या हस्ते होणार आहे. 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नऊ महिन्यातील हा आठवा गुजरात दौरा आहे. नोव्हेंबरमध्ये गुजरात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. गुजरातमध्ये भाजपा सलग पाचव्यांदा सत्तेसाठी प्रयत्न करणार आहे. उत्तरप्रदेश, उत्तराखंडमध्ये मिळालेली विजयाची लय कायम राखणे हा सुद्धा या दौ-यामागे उद्देश आहे.  हिरे व्यापाराचे प्रमुख केंद्र असलेल्या सूरतमध्ये काल पंतप्रधानांनी जोरदार रोड शो केला. जवळपास 10 हजार बाईक्स या रोड शो मध्ये सहभागी झाल्या होत्या. भाजपाने या रोड शो मधून शक्तीप्रदर्शन केले.