शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

यंत्रणेला वेग देण्यासाठी मोदींना हवेत २० पीए

By admin | Updated: September 15, 2015 02:11 IST

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील पंतप्रधान कार्यालय(पीएमओ)हळूहळू मिनी कॅबिनेट बनण्याकडे वाटचाल करीत आहे. मोदींच्याच अधिपत्याखालील कार्मिक मंत्रालयाने काढलेली लक्षवेधी नोटीस

- हरीश गुप्ता, नवी दिल्लीनरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील पंतप्रधान कार्यालय(पीएमओ)हळूहळू मिनी कॅबिनेट बनण्याकडे वाटचाल करीत आहे. मोदींच्याच अधिपत्याखालील कार्मिक मंत्रालयाने काढलेली लक्षवेधी नोटीस पंतप्रधान कार्यालय आपली पाळेमुळे विस्तारत असल्याचेच सूचित करणारी आहे. यापुढे चांगली इंग्रजी अवगत असलेले २० स्वीय सहायक(पीए)मोदींच्या दिमतीला राहातील. त्यांची सेवा पाच वर्षांसाठी राहील, असे सूत्रांनी सांगितले.पंतप्रधान कार्यालयाने यापूर्वी कधीही एवढ्या मोठ्या संख्येने स्वीय सहायकांची मागणी केली नव्हती. गेली कित्येक दशके पंतप्रधान कार्यालयाच्या कार्यपद्धतीची ओळख असलेल्यांनीही याआधी कोणत्याही पंतप्रधानांनी स्वीय सहायकांचा एवढा मोठा फौजफाटा ठेवला नव्हता, असे नमूद केले आहे. मोदींनी सुरू केलेल्या विविध योजनांना गती देण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाकडून वेगवान हालचाली केल्या जात असल्याचे संकेत सदर नोटिसीद्वारे मिळाले आहेत. पंतप्रधान कार्यालयाने विविध मंत्रालये आणि खात्यांच्या कामकाजावरील पकड घट्टी केली आहे. पीएमओला पाठविले जाणारे ई-मेल, पत्रे आणि संपर्कासंबंधी अन्य माध्यमांवाटे जलद प्रतिसाद दिला जावा. प्रशासकीय परिणामकारकता वाढविली जावी या उद्देशाने व्यापक बदल हाती घेण्यात आल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव ठेवण्यापूर्वी कॅबिनेट मंत्र्यांनी मंजुरी मिळवावी असा आदेश नुकताच जारी करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर त्या प्रस्तावासंबंधी मसुद्यालाही मंजुरी मिळविण्याची पूर्वअट घालण्यात आली आहे. कॅबिनेट मंत्री पंतप्रधानांसोबत अनौपचारिक चर्चा करूनच असे प्रस्ताव आणत असतात, ही वस्तुस्थिती आहे. कान आणि डोळे गुजरातचेगुजरातमधील एक अधिकारी मोदींचे कान आणि डोळे बनला असला तरी तो स्वत:च चेहरा कधीही समोर येऊ न देता कार्यरत असतो. तो मीडियाशी कधीही बोलत नाही. प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा, उप प्रधान सचिव पी.के. मिश्रा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा कोअर टीममध्ये सहभाग आहे. हिरेन जोशी, हेमांग जैन, प्रतीक दोशी, संजय आर. भावसार हेही पीएमओचे एकात्म भाग बनले आहेत. हे अधिकारी मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असतानाही त्यांच्यासोबत होते. प्रत्येक मंत्रालयात अधिकाऱ्यांची नियुक्ती करताना पंतप्रधानांनी त्या त्या मंत्र्यांशी सल्लामसलतीची प्रक्रिया पार पाडलेली आहे. नियुक्तीसंबंधी मंत्रिमंडळ समितीचे सदस्य केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग हे केवळ नामधारी बनले आहेत. मंत्र्यांच्या वैयक्तिक कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीलाही पीएमओची मंजुरी लागते.आधीच अधिकाऱ्यांची फौज आजवर कधीही नव्हती एवढी अधिकाऱ्यांची फौज सध्या पीएमओकडे आहे. विदेश मंत्रालय जनपथ मार्गावर हलविण्यात आल्यानंतर तेथील मोठी रिक्त जागा पंतप्रधान कार्यालयाने काबीज केली आहे. डॉ. मनमोहनसिंग यांच्या दहा वर्षाच्या राजवटीतील पीएमओपेक्षा मोदींचे कार्यालय पूर्णपणे वेगळे आहे. मोदींची केवळ प्रशासनावरच नव्हे तर जलद गतीने निर्णयावर पकड आहे. त्यांच्याकडे मीडियावर निगराणी ठेवणारी मोठी यंत्रणा असून प्रत्येक मिनिटांची घडामोड त्यांना कळविली जाते. तातडीने त्यावर प्रतिसादही मागविला जातो.