शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

एनएसजीसाठी पाठिंबा दिल्याबद्दल मोदींनी मानले ब्राझीलचे आभार

By admin | Updated: October 18, 2016 04:52 IST

भारताच्या मोहिमेला पाठिंबा दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष मायकेल टेमेर यांचे सोमवारी येथे आभार मानले.

बाणावली (गोवा) : अणुपुरवठादार देशांच्या गटाचे (एनएसजी) सदस्यत्व मिळविण्याच्या भारताच्या मोहिमेला पाठिंबा दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष मायकेल टेमेर यांचे सोमवारी येथे आभार मानले. उभय देशांनी गुंतवणूक सहकार्यासह चार सामंजस्य करारावर सोमवारी स्वाक्षरी केली. त्यानंतर ब्राझिलियन राष्ट्राध्यक्षांसोबत संयुक्त घोषणापत्र जारी करताना मोदी बोलत होते. एनएसजीचा भाग होण्याची भारताची आकांक्षा समजून घेतल्याबद्दल ब्राझीलला धन्यवाद देतो, असे ते म्हणाले. भारताच्या दहशतवादविरोधी कारवाईला पाठिंबा दिल्याबद्दलही मोदींनी त्यांचे आभार मानले. प्रसिद्धी माध्यमांना दिलेल्या निवेदनात मोदींनी म्हटले की, ब्राझील हा भारताचा लॅटिन अमेरिकेतील सर्वात महत्त्वाचा आर्थिक भागीदार आहे. भारत आणि ब्राझीलमधील द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत झाले असून, सर्व स्तरांवर आमचा संवादही वाढला आहे. मी ब्राझिलियन कंपन्यांचे स्वागत करतो. त्यांनी येथे येऊन गुंतवणूक करावी. सेऊल येथे जूनमध्ये झालेल्या एनएसजीच्या बैठकीत भारताच्या एनएसजीतील प्रवेशाला ब्राझीलने विरोध केला नव्हता. अण्वस्त्र प्रसारबंदी करारावर स्वाक्षरी न केलेल्या देशांना समान निकषांच्या आधारे संघटनेत स्थान दिले जावे, अशी भूमिका ब्राझीलने मांडली होती, हे विशेष. (प्रतिनिधी)