शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

'मोदी टाळीने कोरोना रोखतात, मग आम्ही अजानने का नाही रोखू शकत'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2020 12:47 IST

लॉकडाउनमुळे सामूहिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आय़ोजन करण्यास बंदी घालण्यात आली आहे. देशातील तमाम मुस्लिम संघटनांनी देखील कोरोना व्हायरसचे संकट पाहता, मशिदीत नमाजसाठी एकत्र  न येण्याचे आवाहन केले आहे.

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसचा वाढता प्रसार रोखण्यासाठी जगातील सर्वच देश प्रयत्न करत आहेत. भारतात देखील कोरोनाला आळा घालण्यासाठी व्यापक प्रयत्न करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउन करण्यात आले आहे. लोकांना घऱातून बाहेर न पडण्याचा इशारा दिला आहे. मात्र काही राजकीय नेत्यांकडून कोरोना व्हायरसच्या आपत्तीत देखील राजकारण करण्यात येत आहे. तृणमूल काँग्रेसच्या नेत्याने मुस्लिमांना अजानसाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.

पश्चिम बंगालमधील या टीएमसी नेत्याचे नाव अख्तर हुसैन आहे. देशात लॉकडाउन असताना देखील लोकांना आवाहन केले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी टाळी वाजवून कोरोनाला रोखू शकतात तर मग कोरोनाला मात देण्यासाठी आपण प्रार्थना  का करू नये, असा अजब सवाल केला. पंतप्रधान मोदींनी २२ मार्च रोजी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. तसेच सायंकाळी पाच वाजता आरोग्य कर्मचारी आणि पोलिसांचे आभार मानण्यासाठी लोकांना पाच मिनिटं टाळ्या, थाळी किंवा घंटी वाजविण्याचे आवाहन केले होते.

या संदर्भात हुसैन यांना माध्यमातून प्रश्न विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले की, कोरोना व्हायरसवर आतापर्यंत लस निघाली का ? कोरोनाला अजानने रोखता येऊ शकते. लोक काही ना काही कारण काढून रस्त्यावर फिरत आहेत. मग अजानसाठी एकत्र आले तर काय बिघडतं असा उलट प्रश्न हुसैन यांनी केला.

लॉकडाउनमुळे सामूहिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आय़ोजन करण्यास बंदी घालण्यात आली आहे. देशातील तमाम मुस्लिम संघटनांनी देखील कोरोना व्हायरसचे संकट पाहता, मशिदीत नमाजसाठी एकत्र  न येण्याचे आवाहन केले आहे.