शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

दलित विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी मोदींनी देशाची माफी मागावी - केजरीवाल

By admin | Updated: January 19, 2016 13:37 IST

रोहित वेमुला या दलित विद्यार्थ्याच्या आत्महत्येसाठी जबाबदार असलेल्या मंत्र्यांची पंतप्रधान मोदींनी हकालपट्टी करून देशाची माफी मागावी अशी मागणी केजरीवाल यांनी केली

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १९ - रोहित वेमुला या दलित विद्यार्थ्याने हैदराबाद केंद्रीय विद्यापीठाच्या वसतिगृहात गळफास लावून घेतल्याचे प्रकरण सध्या चांगलेच तापले असून देशभरात या घटनेचे पडसाद उमटताना दिसत आहेत. ' पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्या विद्यार्थ्याच्या आत्महत्येसाठी जबाबदार असलेल्या मंत्र्याची हकालपट्टी करावी आणि संपूर्ण देशाची माफी मागावी' अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. 
' त्या दलित मुलाचा मृत्यू ही आत्महत्या नव्हे तर तो लोकशाही, सामाजिक मूल्यं आणि समानतेचा खून आहे. मोदीजींनी याप्रकरणी संबंधित मंत्र्यांची हकालपट्टी केली पाहिजे आणि संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे,' असे ट्विट केजरीवाल यांनी केले आहे. 
ऑगस्ट २०१५ मध्ये विद्यापीठात ‘मुझफ्फरनगर बाकी है’ या वृत्तचित्र प्रदर्शनावरून दलित विद्यार्थी संघटना आणि अ.भा. विद्यार्थी परिषदेच्या गटांमध्ये वाद निर्माण झाल्यामुळे रोहित आणि अन्य पाच दलित विद्यार्थ्यांना विद्यापीठातून निलंबित करण्यात आले होते. अभाविपच्या नेत्यावर हल्ला केल्याचा या सर्वांवर आरोप होता. त्या घटनेनंतर तणावाखाली असलेल्या रोहितने अखेर रविवारी गळफास लावून आपले जीवन संपवले. या सर्व प्रकरणामुळे देशातले वातावरण तापले असून  रोहितला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल  सायबराबाद पोलिसांनी केंद्रीय श्रम राज्यमंत्री बंडारू दत्तात्रेय यांच्याविरोधात गुन्हा नोंदविला आहे.
 दरम्यान रोहितच्या आत्महत्येच्या निषेधार्थ पुण्यात एफटीआयआयचे विद्यार्थी एक दिवसाच्या उपोषणास बसले आहेत.