जम्मू-काश्मीर सरकारसाठी पुन्हा हालचालींना वेग लवकरच मोदी- सईद भेट : वाद निकाली काढण्यावर भर
By admin | Updated: February 13, 2015 00:38 IST
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी पुन्हा हालचालींना वेग आला असून भाजप आणि पीडीपीने किमान समान कार्यक्रमांवर वाटाघाटींना अंतिम आकार देण्यासाठी चर्चा सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर पीडीपीचे नेते मुफ्ती मोहम्मद सईद लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
जम्मू-काश्मीर सरकारसाठी पुन्हा हालचालींना वेग लवकरच मोदी- सईद भेट : वाद निकाली काढण्यावर भर
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी पुन्हा हालचालींना वेग आला असून भाजप आणि पीडीपीने किमान समान कार्यक्रमांवर वाटाघाटींना अंतिम आकार देण्यासाठी चर्चा सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर पीडीपीचे नेते मुफ्ती मोहम्मद सईद लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.जम्मू-काश्मीर विधानसभा त्रिशंकू राहिल्याने राष्ट्रपती राजवट लागू होऊन ५० दिवसांपेक्षा जास्त काळ उलटला असताना दोन्ही पक्षांनी पुन्हा एकदा मतभेद संपविण्यासाठी चर्चा सुरू केली आहे. कलम ३७०, वादग्रस्त सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा, विघटनवाद्यांबद्दलचे धोरण तसेच या राज्याला विशेष राज्याचा दर्जा देण्यासंबंधी मुद्यांवर तोडगा काढण्यावर भर दिला जात आहे.८७ सदस्यीय विधानसभेत पीडीपीचे २८ तर भाजपचे २५ आमदार असून यापक्षाने भाजपसोबत रचनात्मक चर्चा चालविण्यासाठी सहा जणांची चमू स्थापन केली आहे. भाजपने चर्चेसाठी अर्थमंत्री अरुण जेटली आणि अरुणसिंग यांना नियुक्त केले असून पीडीपीचे शिष्टमंडळ शुक्रवारी दिल्लीत दाखल झाल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे. त्यानंतर मोदी आणि सईद यांच्यात सरकार स्थापण्यासंबंधी करारावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.-------------------------मुख्यमंत्रिपद पीडीपीकडे...सईद यांना सहा वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद देण्याला भाजपने तत्त्वत: सहमती दर्शविल्यामुळे वाटाघाटीचा मार्ग प्रशस्त झाला आहे. भाजपचे नेते निर्मलसिंग हे उपमुख्यमंत्री राहतील. दोन पक्षांदरम्यान मुंबई आणि चंदीगड येथे पार पडलेल्या चर्चेच्या मालिकेनंतर पीडीपीकडे गृह तर भाजपकडे अर्थमंत्रालय ठेवण्यावर सहमती झाली आहे.