शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

मोदींनी सुचवली आशिया-आफ्रिका कॉरिडोरची कल्पना

By admin | Updated: May 23, 2017 18:42 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपान आणि भारताच्या पाठिंब्याने आशिया-आफ्रिका विकास कॉरिडोरची कल्पना मांडली आहे

ऑनलाइन लोकमत
गांधीनगर, दि. 23 - एकीकडे चीन वन बेल्ट वन रोड योजनेच्या माध्यमातून अर्धे जग आपल्या अवाक्यात आणण्यासाठी मोर्चेबांधणी करत असतानाच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपान आणि भारताच्या पाठिंब्याने आशिया-आफ्रिका विकास कॉरिडोरची  कल्पना मांडली आहे. गांधीनगर येथे आज आफ्रिकी विकास बँकेच्या 52व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे उद्धाटन करताना मोदींनी  ही कल्पना उपस्थितांसमोर ठेवली. अशा स्वरूपाची बैठक भारतात पहिल्यांदाच होत आहे. 
 
यावेळी मोदी म्हणाले, "भारताची आफ्रिकेसोबत असलेली भागीदारी सहकार्याच्या मॉडेलवर आधारित आहे.  हे मॉडेल आफ्रिकी देशांच्या गरजांप्रमाणे तयार करण्यात आलेले आहे. जापान दौऱ्यादरम्यान जापानी पंतप्रधान शिंजो अबे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत जारी करण्यात आलेल्या संयुक्त घोषणापत्रामध्ये आम्ही आशिया आणि आफ्रिकी देशांमध्ये विकास कॉरिडोरचा समावेश करण्यात आला होता. त्यासाठी आमच्या आफ्रिकी मित्रदेशांशी चर्चा करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता."
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मांडलेली ही कल्पना चीनच्या वन बेल्ड वन रोड योजनेला प्रत्युत्तर मानली जात आहे. वन बेल्ट वन रोड योजनेमध्ये चीनने मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक केली आहे. याद्वारे आशियाई भूखंडाला हिदी महासागर आणि पॅसिफीक महासागरापर्यंत रस्ते मार्गाने जोडण्यात येणार आहे. 
 
 यावेळी मोदी पुढे म्हणाले, "भारत आणि आफ्रिकेमधील संबंध अनेक शतके जुने आहेत. गुजराती लोकसुद्धा आफ्रिकेप्रती आपल्या प्रेमासाठी ओळखले जातात. आफ्रिकेसोबतची आमची भागीदारी सहकार्यावर आधारित आहे. 1996 ते 2016 या काळात आफ्रिकेने भारतामधून 20 टक्के एफडीआय मिळवला आहे."