शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

....तर मोदी लाटेतही निवडून आलो असतो जयंत पाटील : पृथ्वीराज चव्हाणांच्या कारभारावर टिका

By admin | Updated: September 22, 2016 01:16 IST

जळगाव : राज्यात आमचे आघाडी सरकार मागील दोन वर्षे नकारात्मकपणे चालविण्यात आले. त्याचा फटका आम्हाला बसला. मागच्या दोन वर्षात सकारात्मक पद्धतीने सरकार चालविले असते तर मोदी लाटेतही आम्ही निवडून आलो असतो व सत्ता मिळाली असती, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री जयंत पाटील यांनी माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या कामकाजावर टिका केली आहे. ते पाल रा.रावेर येथील मेळाव्यानिमित्त जळगाव येथे आले असता लोकमतने त्यांच्याशी संवाद साधला.

जळगाव : राज्यात आमचे आघाडी सरकार मागील दोन वर्षे नकारात्मकपणे चालविण्यात आले. त्याचा फटका आम्हाला बसला. मागच्या दोन वर्षात सकारात्मक पद्धतीने सरकार चालविले असते तर मोदी लाटेतही आम्ही निवडून आलो असतो व सत्ता मिळाली असती, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री जयंत पाटील यांनी माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या कामकाजावर टिका केली आहे. ते पाल रा.रावेर येथील मेळाव्यानिमित्त जळगाव येथे आले असता लोकमतने त्यांच्याशी संवाद साधला.
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सध्या सुंदोपसुंदी सुरू आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी याची सुरुवात अकोला येथील कार्यक्रमातून केली. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही चव्हाण यांना लक्ष्य करीत बाबांच्या चुकीच्या धोरणांमुळे सत्ता गेली असे विधान केले आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे नेते माझ्याकडे बिल्डरांच्या फायली घेऊन यायचे. दबाव आणायचे. मी राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांच्या खोट्या चौकशा लावल्या असा आरोपही केला जातो, असेही चव्हाण म्हणाले होते. या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी माजी मुख्यमंत्री चव्हाण यांच्या कारभारावर टिका केली आहे.
प्रस्ताव कुणाचे हे बघितले जायचे
जयंत पाटील पुढे म्हणाले, आघाडी सरकारच्या शेवटच्या काळात दिरंगाई, टाळाटाळ असे प्रकार सुरू झाले. मंजुरीसाठी आलेला प्रस्ताव कोणत्या पक्षाचा आहे हे बघितले जायचे. निर्णय घेतले जात नव्हते, असेही पाटील म्हणाले.
खडसेंची वापसी अशक्य
राज्य सरकारमधील मंडळीने ज्या पद्धतीने माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना निरोप दिला ते पाहता खडसे पुन्हा मंत्रीमंडळात परततील, असे मला वाटत नाही. खडसे यांच्यावर जे आरोप झाले आहेत त्याबाबत खडसे निर्दोष बाहेर पडतात की नाही हेदेखील महत्त्वाचे आहे. त्यांना आपले निर्दोषत्व सिद्ध करावे लागेल, असेही पाटील म्हणाले.