शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

‘गो बॅक’ ट्रेंडमुळे मोदींना बदलावा लागला मार्ग!, काळे झेंडे दाखवून व्यक्त केला निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 04:12 IST

कावेरी प्रश्नासंदर्भात केंद्र सरकारने नाकर्तेपणाची भूमिका घेतल्याच्या निषेधार्थ गुरुवारी मोदी विरोधात ‘गोबॅकमोदी’ अशा हॅशटॅगची लाट आली.

चेन्नई : कावेरी प्रश्नासंदर्भात केंद्र सरकारने नाकर्तेपणाची भूमिका घेतल्याच्या निषेधार्थ गुरुवारी मोदी विरोधात ‘गोबॅकमोदी’ अशा हॅशटॅगची लाट आली. तामिळनाडूत पंतप्रधान येत असतानाच त्यांच्या निषेधासाठी घरोघरी, रस्त्यारस्त्यांवर आणि कार्यालयांतही काळे झेंडे, काळे फुगे, काळ्या कपड्यांत लोकांनी आंदोलने केली. गेल्या चार वर्षांत पहिल्यांदाच एखाद्या राज्यात मोदींविरोधात एवढ्या मोठ्या प्रमाणात असंतोष दिसून आला.तामिळनाडूतील तिरुविदंताई येथे आयोजिलेले देशातील सर्वांत मोठे संरक्षणविषयक प्रदर्शन डिफेएक्स्पोचे उद्घाटन करण्याकरिता मोदी आले. त्या वेळी काळे झेंडे दाखवून तामिळी संघटनांनी निषेध नोंदविला. तामिळ भाषकांच्या संघटनांची शिखर संस्था तामिळार वळवूईरिमलाई कुट्टामईप्पू (टीव्हीके) व आमदार थमिमून अन्सारी प्रमुख असलेल्या मनितानेई जननयाग कच्ची या संघटनांनी चेन्नई विमानतळावर पंतप्रधानांना काळे झेंडे दाखविले. कावेरी जलव्यवस्थापन मंडळाची स्थापना न केल्याच्या निषेधार्थ द्रमुकचे प्रमुख एम. करुणानिधी, कार्यकारी अध्यक्ष एम. के. स्टॅलिन, खासदार कनिमोळी व अन्य नेत्यांनी आपल्या घरांवर काळ्या रंगाचे ध्वज लावले होते. इरोडे जिल्ह्यामध्ये द्रमुकच्या काळ्या रंगाचे फुगे सोडून निषेध केला. या प्रकरणी ५० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.>युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्नकावेरी प्रश्नासंदर्भात केंद्र व तामिळनाडू सरकारने नाकर्तेपणाची भूमिका घेतल्याच्या निषेधार्थ इरोडे येथे धर्मलिंगम या २५ वर्षे वयाच्या एका युवकाने गुरुवारी आत्मदहनाचा प्रयत्न केला. तो ९० टक्के भाजला असूनत्याला इरोडे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून धर्मलिंगमची मानसिकस्थिती बिघडली होती, असे पोलिसांनी सांगितले.टिष्ट्वटरवर पेटले कावेरीचे पाणी : कावेरी जलव्यवस्थापन मंडळ स्थापन करण्यास केंद्र का टाळाटाळ करीत आहे, असा सवालही अनेक लोकांनी ट्विटरवर विचारला. निषेधासाठी घरोघरी, रस्त्यारस्त्यांवर आणि कार्यालयांतही काळे झेंडे, काळे फुगे, काळ्या कपड्यांत लोकांनीआंदोलने केली.>‘गो बॅक मोदी' हॅशटॅग वापरून१५ लाख लोकांचे टष्ट्वीट!कावेरी प्रश्नी मोदींनी आश्वासने न पाळल्याने त्यांच्या निषेधासाठी तामिळी संघटनांनी गुरुवारी टिष्ट्वटरवर गोबॅकमोदी मोहीम चालविली. हा हॅशटॅग जगभरात दिवसभर ट्रेडिंग होता. जवळपास १५ लाखांहून अधिक लोकांनी या हॅशटॅगचा वापर करून मोदींचा सोशल मीडियावर निषेध केल्याचे दिसून आले.