नवी दिल्ली : मोदी सरकार ‘सूटबूट की सरकार’ आहे, या काँगे्रस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या आरोपांना अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी लोकसभेत जशास तसे उत्तर दिले. मोदी सरकार ‘सूझबूझ की सरकार’(सूज्ञ) सरकार आहे, असे जेटली म्हणाले.पंजाबचा दौऱ्यावरून परतलेले राहुल गांधी यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विदेश दौऱ्यांवर बोचरी टीका केली होती. मोदी सरकार ‘सूटबूट की सरकार’ आहे. पंतप्रधान कधीमधी भारतात असतात. सध्या ते भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. तेव्हा त्यांनी पंजाबचा दौरा करून तेथील शेतकऱ्यांना भेटावे, असे राहुल गांधी म्हणाले होते. हे सरकार ‘सूझबूझ की सरकार’ आहे. अर्थव्यवस्थेला चालना देणे आणि घटनात्मक चौकट शाबूत राखणे यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे. तुमचे नेते(काँग्रेस सदस्यांना उद्देशून) म्हणतात की, पंतप्रधान विदेश दौऱ्यावर असतात. सध्या येथे आले आहेत. किमान पंतप्रधान कुठे असतात, हे तरी ठाऊक असते. (लोकमत न्यूज नेटवर्क)
मोदी सरकार ‘सूझबूझ की सरकार’ -जेटली
By admin | Updated: May 1, 2015 01:49 IST