शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

देशाच्या सीमारेषेवर मोदी सरकारची 'भारतमाला'

By admin | Updated: April 29, 2015 11:40 IST

देशाच्या सीमारेषेवर दळणवळणाच्या सुविधेचा विकास करण्यासाठी मोदी सरकारने सीमारेषेवर 'भारतमाला' प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २९ - देशाच्या सीमारेषेवर दळणवळणाच्या सुविधेचा विकास करण्यासाठी मोदी सरकारने सीमारेषेवर 'भारतमाला' प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार गुजरात ते मिझोरामपर्यंतच्या सीमारेषेला जोडण्यासाठी तब्बल ५,३०० किलोमीटरचा रस्ता विकसीत केला जाणार आहे. 

चीनसारखा शेजारी राष्ट्र सीमारेषेवर पायाभूत सुविधा निर्माण करत असून रस्ते व लोहमार्गाच्या माध्यमातून सीमारेषा जोडण्याचे चीनचे प्रयत्न आहेत. आता मोदी सरकारही  भारताच्या सीमारेषेवर रस्त्यांचा विकास करण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रकल्पात गुजरातपासून ते मिझोरामपर्यंतच्या सीमारेषेवर रस्ता बांधला जाईल. हा रस्ता गुजरातमधून राजस्थान, पंजाबमार्गे हिमाचलप्रदेश, जम्मू आणि काश्मीर, उत्तराखंडपर्यंत जाईल. उत्तराखंडहून उत्तरप्रदेशमधील सीमा रेषेवरुन बिहार, सिक्कीम, आसाम, अरुणाचलप्रदेश, मणिपूर व मिझोराम या राज्यांमधील सीमारेषेपर्यंत हा रस्ता नेला जाईल. या प्रकल्पात ५ हजारहून अधिक किलोमीटरचे रस्ते नव्याने बांधावे लागतील असे समजते. यासाठी सुमारे १४ हजार कोटी रुपये ऐवढा खर्च अपेक्षीत आहे. या प्रकल्पाला विविध खात्यांकडून नियोजित वेळेत परवानगी मिळाल्यास चालू वर्षातच रस्त्यांच्या कामाला सुरुवात होऊ शकेल असे केंद्रीय रस्ता वाहतूक मंत्रालयाचे सचिव विजय छिब्बर यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला सांगितले आहे. या प्रकल्पात आर्थिक अडचणीपेक्षा भूसंपादन प्रक्रीया व पर्यावरण खात्याची मंजूरी मिळवणे ही प्रमुख अडचण असल्याचे एका अधिका-याने सांगितले.