शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारचे वागणे कुंभकर्णासारखे - सुप्रीम कोर्ट

By admin | Updated: October 10, 2014 10:37 IST

पर्यावरणविषयक अहवाल सादर करण्यास दिरंगाई करणा-या मोदी सरकारला तुम्ही कुंभकर्णासारखे वागत आहात अशा शद्बात सुप्रीम कोर्टाने फटकारले आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. १० -  प्रशासकीय कामकाज वेगवान करण्याची ग्वाही देणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला सुप्रीम कोर्टाने गुरुवारी खडे बोल सुनावले आहेत. अहवाल सादर करण्यास दिरंगाई करणा-या केंद्र सरकारला तुम्ही कुंभकर्णासारखे वागत आहात अशा शद्बात सुप्रीम कोर्टाने फटकारले आहे. 
उत्तराखंडमधील अलकनंदा व भागीरथी या नद्यांवरील हायड्रोइलेक्ट्रीक प्रकल्पांविषयी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली आहे. या प्रकल्पांमुळे नद्यांमधील जैवविविधतेवर होणारे परिणाम याविषयी सुप्रीम कोर्टाने केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाला दोन महिन्यांमध्ये अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. गुरुवारी या याचिकेवर सुनावणी झाली. पर्यावरण मंत्रालयाने दोन महिन्यानंतरही अहवाल सादर न केल्याने न्या. दीपक मिश्रा व आर.एफ. नरिमन यांच्या खंडपीठाने केंद्र सरकारची खरडपट्टीच केली. 'आज आमच्यासमोर अहवाल पाहिजे होता. तुम्ही (केंद्र सरकार) कुंभकर्णासाराखे वागत असून केंद्र सरकारने आज अहवाल का सादर केला नाही हेच आम्हाला समजत नाही, तुम्हाला नेमकं काय हवंय ? असा सवाल खंडपीठाने केंद्र सरकारला विचारला. तुम्ही रिप वॅन विंकल सारखेच आहात अशी टिप्पणीही कोर्टाने केली. रिप वॅन विंकल हे १९ व्या दशकाच्या इंग्रजी कथांमधील सर्वात कामचुकार पात्र म्हणून ओळखले जाते.