शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बाजारातील घसरणीमुळे मोदी सरकार चिंतित

By admin | Updated: August 25, 2015 04:26 IST

भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया भक्कम आहे, त्यामुळे रुपयाचे अवमूल्यन आणि शेअर बाजारात झालेल्या मोठ्या घसरणीमुळे घाबरण्याचे वा चिंता करण्याचे काही कारण नाही, असे साहसी

- हरीश गुप्ता,  नवी दिल्लीभारतीय अर्थव्यवस्थेचा पाया भक्कम आहे, त्यामुळे रुपयाचे अवमूल्यन आणि शेअर बाजारात झालेल्या मोठ्या घसरणीमुळे घाबरण्याचे वा चिंता करण्याचे काही कारण नाही, असे साहसी वक्तव्य केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली आणि त्यांचे राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी केलेले असले तरी संकट अद्याप टळलेले नाही, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.जागतिक अर्थव्यवस्थेत सर्व काही आलबेल नाही आणि महागाईवरील युद्ध अद्याप संपलेले नाही, असे संकेत भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन हे गेल्या काही दिवसांपासून देत आलेले आहेत. सात टक्के विकास दर आणि शेअर बाजाराचा प्राईज अर्निंग रेशो ३० पट राहणे हा गंभीर चिंतेचा विषय आहे, असे राजन यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते. त्यानंतर सोमवारी त्याची प्रचिती आली आणि मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आणि निफ्टीमध्ये लक्षणीय घसरण पाहायला मिळाली.चलन युद्धाने वाईट वळण घेतले तर निर्देशांक २० हजारापर्यंत कोसळण्याची शक्यता आहे, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाच्या किंमतीत प्रचंड घट झाल्यामुळे भारताला फायदा झाला असला तरी डॉलरच्या तुलनेत रुपयाची ७० पर्यंत घसरण होऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. जागतिक बाजारपेठेत भारतीय उत्पादने स्पर्धेतच राहणार नसल्याने भारतीय उत्पादक आणि निर्यातदार यांना जबरदस्त फटका बसेल, याची मोदी सरकारला जास्त चिंता वाटत आहे. एका दिवसात शेअर बाजाराचा निर्देशांक १७०० अंकाने घसरणे आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन होऊन तो प्रति डॉलर ६६.७४ वर येण्याचा थेट संबंध जागतिक बाजारपेठ आणि चलनाशी आहे. जागतिक मंदी आणि एका आठवड्यात आपल्या चलनाचे तब्बल सहा टक्क्याने अवमूल्यन करून चीनने छेडलेल्या चलन युद्धाचा तो एक भाग आहे. चीनने आपल्या चलनाचे अवमूल्यन करून आणि जागतिक निर्यात बाजारपेठ काबीज करून एकप्रकारे आर्थिक युद्धच पुकारले आहे, असे दिसते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी वित्तमंत्री अरुण जेटली यांच्यासोबत या आर्थिक संकटाबाबत चर्चा केल्याचे वृत्त आहे. वित्त मंत्रालय, भारतीय रिझर्व्ह बँक आणि अन्य सरकारी संस्था या चालू संकटावर लक्ष ठेवून आहेत. युरोप आणि सिंगापूरच्या शेअर बाजारात सोमवारी सायंकाळी मोठी घसरण झाली असतानाच अमेरिकेचा शेअर बाजार पुन्हा एकदा कोसळला. त्यामुळे अनिश्चितता कायम राहणार हे निश्चित आहे. आता रुपया व शेअर बाजारातील ही घसरण रोखण्यासाठी रिझर्व्ह बँक हस्तक्षेत करेल असे वाटत नाही आणि वित्तीय संस्था बाजारात प्रचंड पैसा ओततील, अशी शक्यताही दिसत नाही. याबाबत मंगळवारी दुपारपर्यंत एखादा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.मोठे आर्थिक प्रश्न नियंत्रणात आहेत आणि महागाईत घट झाल्याने गुंतवणूकदारांचा बाजारातील विश्वास वाढेल. त्यामुळे अन्य उदयमान बाजार अर्थव्यवस्थेच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्था बरी आहे, असे राजन सांगत आहेत. परंतु व्याज दरात कपात करण्याच्या संदर्भात मात्र राजन काहीएक बोलायला तयार नाहीत. व्याजदर कमी करण्यात आले पाहिजे असे वित्तमंत्री अनेक दिवसांपासून सांगत आहेत, हे विशेष.मोदी सरकार अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित करणे आणि गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी कठोर परिश्रम घेत असताना हे संकट ओढवले आहे. त्यामुळे आपल्या दारावर येऊन ठेपलेले हे आर्थिक संकट पाहता आता अमेरिकाही सप्टेंबर महिन्यात व्याज दरात वाढ करण्याचा विचार करीत आहे. याचाच अर्थ हे ‘क्वांटेटिव्ह इजिंग’ डिसेंबरपर्यंत तरी कायम राहील.