शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारमुळे बेकारी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 05:01 IST

पी. चिदम्बरम : धाडसी निर्णय घेण्यास टाळाटाळ

नवी दिल्ली : देशात बेकारीच्या समस्येने गंभीर स्वरूप धारण केले आहे. त्याचे बोलके उदाहरण म्हणजे मध्यंतरी खलाशांच्या ६२,९०७ जागांच्या भरतीसाठी ८२ लाख उमेदवारांनी अर्ज केला होता. त्यातील ४,१९,१३७ जण बीटेक पदवीधर तर ४०,७५१ जणांनी इंजिनिअरिंगचे पदव्युत्तर शिक्षण घेतलेले होते अशी माहिती माजी केंद्रीय वित्तमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदम्बरम यांनी दिली आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पावर राज्यसभेतील चर्चेत ते बोलत होते. चिदम्बरम म्हणाले की, अशी अर्थव्यवस्था या सरकारच्या कृपेने आपल्याला वारशाने मिळाली आहे. त्यासाठी तिला दोष देण्यात अर्थ नाही. ही वस्तुस्थिती जाणून खरेतर मोदी सरकारने सतर्क राहायला हवे. मात्र या सरकारने डोळ््यासमोर ठेवलेले ध्येय वेगळेच आहे.

मोदी सरकार निर्णय का घेत नाही?लोकसभेत भाजपचे ३०३ खासदार निवडून आले. मनमोहनसिंग व मी या विषयावर चर्चा केली. अशा प्रकारचे ध्येय मनमोहनसिंग यांनी आयुष्यात कधीतरी उराशी बाळगायला हवे होते अशी इच्छा मी व्यक्त केली असे उपरोधिक शैलीत पी. चिदम्बरम यांनी म्हटले आहे.एनडीए व त्यातील घटकपक्षांचे ३५२ खासदार आता लोकसभेत आहेत. असे असूनही अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी मोदी सरकार धाडसी निर्णय का घेत नाही, असा सवालही चिदम्बरम यांनी विचारला.