शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राजीव गांधींच्या मारेक-यांविषयी मोदी सरकारही कठोर ?

By admin | Updated: July 6, 2014 12:51 IST

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसवर तिखट शब्दात टीका करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी राजीव गांधींच्या मारेक-यांविषयी मात्र यूपीए सरकारचे धोरणच पुढे नेतील अशी माहिती सूत्रांनी दिली.

 

 
ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ६ - लोकसभा निवडणुकीत काँग्रेसवर तिखट शब्दात टीका करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी राजीव गांधींच्या मारेक-यांविषयी मात्र यूपीए सरकारचे धोरणच पुढे नेतील अशी माहिती सूत्रांनी दिली. मोदी सरकार माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेक-यांना सोडण्याच्या तामिळनाडू सरकारच्या निर्णयाला विरोध करणार असल्याचे वृत्त आहे. 
१९ फेब्रुवारी रोजी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी राजीव गांधींच्या हत्येप्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या सात जणांना तुरुंगातून मुक्त करण्याचा निर्णय घेतला होता. माजी पंतप्रधानांचे मारेकरी तुरुंगातून सुटत असतील तर  सर्वसामान्यांना काय न्याय मिळेल अशा शब्दात पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी या निर्णयाला विरोध दर्शवला होता.यानंतर तत्कालीन यूपीए सरकारने या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. सुप्रीम कोर्टाने या निर्णयावर स्थगिती आणून प्रकरण संविधान पीठाकडे पाठवले होते. 
नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी काँग्रेसवर हल्लाबोल करुन केंद्रात सत्तेवर विराजमान झाले असले तरी राजीव गांधींच्या मारेक-यांविषयी एनडीए सरकारही कठोर भूमिकाच घेईल अशी चर्चा आहे. फेब्रुवारीमध्ये तामिळनाडू सरकारच्या निर्णयावर भाजपचे नेते अरुण जेटली आणि रविशंकर प्रसाद यांनी नाराजी दर्शवली होती. आता हे दोन्ही नेते केंद्रीय अर्थमंत्री आणि कायदा मंत्री यापदावर आहेत. मंगळवारी सुप्रीम कोर्टात राजीव गांधींच्या मारेक-यांच्या सुटकेविरोधात दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी आहे. या सुनावणीत मोदी सरकार मारेक-यांना सोडण्याच्या निर्णयाला विरोधच दर्शवेल असे सूत्रांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध असले तरी दहशतवाद आणि माजी पंतप्रधानांच्या मारेक-यांविषयी भाजप सौम्य भूमिका घेणार नाही असे पक्षातील नेत्यांचे म्हणणे आहे. मंगळवारी सुप्रीम कोर्ट राजीव गांधींच्या मारेक-यांना सोडण्याचा निर्णय तामिळनाडू सरकारच्या अखत्यारित येतो का तसेच फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा देणे योग्य आहे का यावर निर्णय देण्याची शक्यता आहे.