शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

परराष्ट्र आघाडीवर मोदी सरकार ‘फेल’

By admin | Updated: July 18, 2015 03:23 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे त्यांचे समपदस्थ नवाज शरीफ यांच्यादरम्यान रशियाच्या उफामध्ये झालेल्या बैठकीनंतर पाकिस्तानचा पवित्रा बघून परराष्ट्र धोरणाच्या

- शीलेश शर्मा,  नवी दिल्लीपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे त्यांचे समपदस्थ नवाज शरीफ यांच्यादरम्यान रशियाच्या उफामध्ये झालेल्या बैठकीनंतर पाकिस्तानचा पवित्रा बघून परराष्ट्र धोरणाच्या आघाडीवर मोदी सरकार सपशेल अपयशी ठरल्याच्या निष्कर्षाप्रत काँग्रेस पोहोचली आहे.माजी परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनी या मुद्यावर मोदी सरकारवर प्रहार करताना निव्वळ पोलिसांच्या दंडुकेशाहीने परराष्ट्र धोरण राबविता येत नाही, असा टोमणा मारला. त्यांचा इशारा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्याकडे होता. डोवल हे सध्या परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत मोदींचा डोळा आणि कान झाले आहेत. खुर्शीद यांनी यापूर्वीचे संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार आणि मोदी सरकारने पाकिस्तानसंदर्भात अवलंबलेल्या धोरणाचाही तुलनात्मक आढावा घेतला. ते म्हणाले की, संपुआ शासनकाळात जागतिक पार्श्वभूमी लक्षात घेता पाकिस्तानसोबत चर्चेची गरज वेळोवेळी व्यक्त करण्यात आली. परंतु आम्ही डोळे आणि कान नेहमी उघडे ठेवले. त्यावेळी विरोधकांच्या भूमिकेत असलेली भाजपा मात्र याचा विरोध करीत होती. एकीकडे मोदी आणि शरीफ हातमिळवणी करीत असताना पाक मात्र अण्वस्त्र हल्ल्याची धमकी देत आहे. असे यापूर्वी कधी घडले का? पाकने भारताचा नेहमीच विश्वासघात केला आहे. हे चांगल्या पद्धतीने माहीत असूनही सरकारने डोळे बंद केले आहे. उफामध्ये मोदी-शरीफ बैठकीनंतर सीमेवर सतत गोळीबार सुरू आहे. मोदी पंतप्रधान झाले तेव्हापासून आतापर्यत पाकने ८०० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. चर्चेनंतर १८ नागरिक आणि १२ जवान शहीद झाले, याकडेही खुर्शीद यांनी लक्ष वेधले.चीनला ओळखण्यातही मोदी सरकार अपयशी ठरले आहे. चीनने संयुक्त राष्ट्रात दहशतवादाच्या मुद्यावर पाकचे समर्थन केले. आम्हाला हे का समजू शकले नाही. आफ्रिकेला महत्त्व न देण्याची चूक हे सरकार करीत आहे. जेथून पैसा मिळेल त्यांच्यासोबतच जायला पाहिजे,असे या सरकारचे मत आहे. परंतु ही भूमिका योग्य नाही.पाकिस्तानसोबत अवश्य चर्चा करा. परंतु भूतकाळातील अनुभवांचेही स्मरण ठेवा. कारगील का,केव्हा आणि कसे झाले. डोळे आणि कान उघडे ठेवण्याची गरज आहे. चर्चेसाठी निश्चित डावपेच असले पाहिजेत,असा सल्लाही त्यांनी मोदींना दिला. मोदींच्या परराष्ट्र धोरणाच्या आधारे आम्हाला जास्त दूरचा पल्ला गाठता येणार नाही,असेही स्पष्ट केले.चीनला ओळखण्यातही मोदी सरकार अपयशी ठरले आहे. चीनने संयुक्त राष्ट्रात दहशतवादाच्या मुद्यावर पाकचे समर्थन केले. आम्हाला हे का समजू शकले नाही. पंतप्रधान ज्या पद्धतीने स्वत:चे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न करीत आहेत त्याने काही फायदा होणार नाही, अशी तोफ खुर्शीद यांनी डागली. पाकिस्तानसोबत अवश्य चर्चा करा. परंतु भूतकाळातील अनुभवांचेही स्मरण ठेवा, असा सल्लाही खुर्शीद यांनी मोदी यांना दिला.