नवी दिल्ली : मोदी सरकारने प्रकल्पांच्या अंमलबजावणीत सचिवांकडे महत्त्वाची भूमिका सोपविताना वरिष्ठ नोकरशहांच्या कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल घडवून आणण्याकडे पाऊल टाकले आहे. मंत्रालयातील विविध विभागांच्या आठ सचिवांचा एक कार्यकारी गट स्थापन केला जाणार असून प्रत्येक गटाकडे महत्त्वपूर्ण प्रकल्पांचा झपाट्याने निकाल मिळविण्याची मोठी जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेत मंत्र्यांचा कोणताही औपचारिक सहभाग उरणार नाही. वेगवेगळ्या विभागाचे सचिव एकाच गटात काम करताना दिसतील. हा प्रशासकीय पातळीवरील दुर्मीळ असा प्रयोग मानला जातो. हे गट आपला अहवाल थेट मंत्रिमंडळ सचिवालयाकडे सोपवतील आणि तो पंतप्रधान कार्यालयात जाईल.(लोकमत न्यूज नेटवर्क)
मोदींनी सचिवांना दिले जादा अधिकार
By admin | Updated: May 8, 2015 01:17 IST