शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

शब्दांपेक्षा कृती महत्वाची हे मोदी विसरले - मनमोहन सिंग

By admin | Updated: April 6, 2016 20:51 IST

शब्दांपेक्षा कृतीला महत्व असते हे मोदी विसरले आहेत अशा शब्दात माजी पंतप्रधान आणि काँग्रेस नेते मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली.

ऑनलाइन लोकमत 

गुवहाटी, दि. ६ - शब्दांपेक्षा कृती जास्त बोलते, पंतप्रधान नरेंद्र मोदींना या म्हणीचा विसर पडला आहे. शब्दांपेक्षा कृतीला महत्व असते  हे मोदी विसरले आहेत अशा शब्दात माजी पंतप्रधान आणि काँग्रेस नेते मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली. आसाममधील गुवहाटीमधील सभेमध्ये ते बोलते होते. मनमोहन सिंग आसाममधूनच राज्यसभेवर खासदार आहेत. 
 
शांत, संयमी स्वभावाचे मनमोहन सिंग दहावर्षांच्या सत्ता काळाता फारसे बोलले नाहीत. मोदी याउलट आहेत. मोदी सतत जनतेशी संवाद साधत असतात. मनमोहन सिंग यांच्या मौन बाळगण्यावरुनच भाजपने त्यांना विरोधी पक्षात असताना वारंवार लक्ष्य केले होते. 
 
मनमोहन सिंग यांनी मोदींना त्यांच्या परदेश दौ-यावरुन लक्ष्य केले. मोदींच्या परदेश दौ-याला भाजपकडून मोठी कामगिरी म्हणून दाखवले जातात. पण प्रत्यक्षात या दौ-यातून काहीही निकाल मिळालेले नाहीत असे सिंग म्हणाले. आपले पाकिस्तानबद्दलचे धोरणही अपयशी ठरले आहे अशी टीका सिंग यांनी केली. 
 
निवडणूक प्रचारात मोदींनी प्रत्येकाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले होते. मनमोहन सिंग यांनी आपल्या भाषणात तो मुद्दाही उपस्थित केला. प्रत्यक्षात  मोदी सरकार जनतेला दिलेली मोठमोठी आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याची टीका त्यांनी केली. आसाममध्ये ४ एप्रिलला पहिल्या टप्प्याचे मतदान झाले आता ११ एप्रिलला दुस-या टप्प्याचे मतदान होणार आहे.