नवी दिल्ली : भाजपाने देशव्यापी सदस्य नोंदणीस शनिवारपासून सुरुवात केली. या सदस्य नोंदणीसाठी पक्षाने एक टोलफ्री टेलीफोन नंबर सुरू केला आहे. पक्ष मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सेवेचे उद्घाटन केले व हातातील स्मार्टफोनवरून लगेच त्या नंबरवर फोन करून पक्षाचे पहिले ऑनलाइन सदस्यत्वही घेतले. त्यांच्या पाठोपाठ पक्षाध्यक्ष अमित शहा यांनीही त्या नंबरवरून ऑनलाइन सदस्यत्व घेतले. भाजपाची ही सदस्य नोंदणी मोहीम 31 मार्च 2क्15र्पयत सुरू राहणार आहे.