शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

ब्रिक्स परिषदेनंतर मोदी जाणार म्यानमारला; रोहिंग्यांच्या प्रश्नावर पंतप्रधान चर्चा करणार का ? 

By अोंकार करंबेळकर | Updated: September 2, 2017 15:45 IST

गेल्या आठवडाभरात म्यानमारमधील वांशिक तणाव पुन्हा उफाळून आला आहे.

ठळक मुद्देगेल्या आठवडाभरात म्यानमारमधील वांशिक तणाव पुन्हा उफाळून आला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिक्स परिषदेनंतर म्यानमारला जात असून या भेटीत ते रोहिंग्यांच्या मुद्द्यावर चर्चा करतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. भारतामध्ये ४० हजार रोहिंग्या राहात असल्याचा अंदाज आहे.

मुंबई, दि २- गेल्या आठवडाभरात म्यानमारमधील वांशिक तणाव पुन्हा उफाळून आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिक्स परिषदेनंतर म्यानमारला जात असून या भेटीत ते रोहिंग्यांच्या मुद्द्यावर चर्चा करतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

भारतामध्ये ४० हजार रोहिंग्या राहात असल्याचा अंदाज आहे. देशात जम्मू आणि काश्मीर राज्यात सर्वाधीक रोहिंग्या राहात असल्याची माहिती गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी संसदेच्या पावसाळी अधिवशनात माहिती दिली होती. या रोहिंग्यांना माघारी पाठवण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले होते. मात्र सरकारच्या या कल्पनेवर भारतातील मानवाधिकार कार्यकर्त्यांनी टीका केली होती. हैदराबाद येथे राहणाऱ्या रोहिंग्यांनी तर आम्हाला ठार मारा परंतु परत मायदेशी पाठवू नका अशी विनंती केली आहे. 

गेल्या आठवडाभरात रखाइन प्रांतातील रोहिंग्या, रखाइन, बौद्ध व हिंदू या सर्वांचे जीवन विस्कळीत झाले आहे. येथे निर्माण झालेल्या तणावात ४०० लोकांचे प्राण गेले असावेत, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. लष्कराच्या बळावर रोहिंग्यांना देशाबाहेर हाकलण्याच्या प्रक्रियेवर संपूर्ण जगाने टीका केली आहे. संयुक्त राष्ट्राने आंग सान सू ची यांच्या सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे. या पार्श्वभूमिवर पंतप्रधान नरेंद्र मोदी रोहिंग्यांचा मुद्दा चर्चेमध्ये उपस्थित करतील अशी अपेक्षा आहे. पंतप्रधान ६ आणि ७ सप्टेंबर असे दोन दिवस म्यानमार दौऱ्यावर असतील. राजधानी नायपीडाँवमध्ये भारतात बेकायदेशीररित्या राहणाऱ्या रोहिंग्यांसह इतर मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

रोहिंग्यांचा प्रश्न नक्की आहे तरी काय ? 2012 साली एका बलात्काराच्या प्रकरणानंतर रोहिंग्यांच्या विरुद्ध रखाईन आणि बौद्ध समुदाय असा तणाव नव्याने निर्माण झाला. रोहिंग्या आमच्या देशात बाहेरून आले आहेत. त्यांचा आमच्या देशाला धोका आहे. ते आपली लोकसंख्या वाढवून आमचा पाकिस्तान, बांगलादेश किंवा मलेशिया- इंडोनेशिया सारखा देश करुन टाकतील अशी भिती म्यानमारचे लोक आणि कट्टर उग्रवादाचे समर्थन करणारे धर्मगुरु उघडपणे बोलू लागले. त्यानंतर झालेल्या जाळपोळ, बलात्कार, गोळीबार आणि हत्येच्या सत्रामुळे गेल्या पाच वर्षांमध्ये 1 लाख चाळीस हजार रोहिंग्यांनी बांगलादेश सोडला आहे. काही रोहिंग्यांनी अन्नपाण्याविना साध्या लाकडी बोटींतून मलेशिया, थायलंड, इंडोनेशिया गाठले. जे जिवंत किनाऱ्याला लागले ते बेकायदेशिररित्या जीव मुठीत धरून आग्नेय आशियामध्ये कसेबसे राहात आहेत. 1990 पासून 4 लाख रोहिंग्यांनी बांगलादेशात राहण्याचा पर्याय निवडून तिकडे पलायन केले आहे. आजही ते सत्र सुरुच आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी