शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

मोदीलाट ओसरली!

By admin | Updated: August 26, 2014 04:35 IST

केंद्रात सत्तेत आल्याला उणेपुरे ९० दिवस होत नाहीत तोच पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहांच्या नेतृत्वातील भाजपाची ४ राज्यांतील १८ जागांसाठी झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत पीछेहाट झाली आहे.

फराज अहमद, नवी दिल्लीकेंद्रात सत्तेत आल्याला उणेपुरे ९० दिवस होत नाहीत तोच पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहांच्या नेतृत्वातील भाजपाची ४ राज्यांतील १८ जागांसाठी झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत पीछेहाट झाली आहे. या निकालांनी धर्मनिरपेक्षतेवर श्रद्धा असलेल्या काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांच्या आशा पल्लवित केल्या आहेत. बिहार, पंजाब, कर्नाटक व मध्य प्रदेशात या पोटनिवडणुका झाल्या. लोकसभेतील यश हा मोदींचा विजय असल्याचे सांगणारे भाजपा नेते आता हा निकाल म्हणजे मोदींच्या कामावरील जनमत नव्हे, असे सांगू लागले आहेत.बिहारमधील मतदारांनी नव्याने स्थापन झालेल्या लालू-नितीश आणि काँग्रेसच्या आघाडीवर विश्वास दाखवला. तेथील १० जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रीय जनता दल, संयुक्त जनता दल आणि काँग्रेसला मिळून सहा ठिकाणी विजय मिळाला. भाजपाला चार जागांवर समाधान मानावे लागले. भाजपाच्या दोन जागा कमी झाल्या आहेत. राजदला तीन, जदयूला दोन व काँग्रेसला एका जागेवर विजय मिळाला. रामविलास पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीला भोपळाही फोडता आला नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीत याच १० जागांपैकी सहा भाजपाने, तीन राजदने आणि एक जागा जदयूने जिंकली होती. पंजाबमध्ये दोन जागांपैकी एक जागा काँग्रेस व एक जागा अकाली दलाने जिंकली. पटियाला मतदारसंघात काँग्रेसच्या परणीत कौर व दुसऱ्या जागेवर शिरोमणी अकाली दलाचे जित मोहिंदरसिंग विजयी झाले.