शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी इमारतींवर आता मोबाईल टॉवर

By admin | Updated: September 12, 2015 03:01 IST

कॉल ड्रॉपसह अन्य नेटवर्क समस्यांचा सामना करणाऱ्या मोबाईल युजर्सना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न म्हणून, राजधानी दिल्ली आणि अन्य काही शहरांमधील शासकीय

नवी दिल्ली : कॉल ड्रॉपसह अन्य नेटवर्क समस्यांचा सामना करणाऱ्या मोबाईल युजर्सना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न म्हणून, राजधानी दिल्ली आणि अन्य काही शहरांमधील शासकीय इमारतींवर मोबाईल टॉवर उभारण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचा निर्णय केंद्रीय नगरविकास मंत्रालयाने घेतला आहे.यासंदर्भात आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश नगरविकासमंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी अधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तथापि अशा प्रकारचे टॉवर्स उभारण्यासाठी प्रस्ताव आणणे आणि सूचना करण्याचे काम दूरसंचार विभागालाच करावे लागणार आहे. हा मुद्दा केवळ शासकीय इमारतींशी संबंधित असल्याकारणाने मोबाईल टॉवर्स उभारण्याच्या दिशेने आवश्यक असलेले पाऊल तात्काळ उचलले जाऊ शकते, असे मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने म्हटले आहे. राजधानीत नेटवर्कची समस्या तीव्रगेल्या काही महिन्यांत दिल्लीसह अन्य अनेक शहरांमध्ये नेटवर्कची समस्या तीव्र होत चालली आहे. निवासी भागांमधील मोबाईल फोन टॉवर्सपासून आरोग्याला धोका निर्माण होेण्याची भीती व्यक्त केली जात असल्यामुळे दिल्लीतील महानगरपालिका प्रशासनाने अनेक मोबाईल टॉवर्स सील केले आहेत. निदान आमची कार्यालये असलेल्या इमारतीच्या ठिकाणी तरी मोबाईल कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी आम्ही शक्य ती आवश्यक पावले उचलणार आहोत. हा अतिशय गंभीर प्रश्न आहे आणि ग्राहकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने सरकार सर्वतोपरी उपाययोजना करीत आहे, असे हा अधिकारी म्हणाला.

(लोकमत न्यूज नेटवर्क)