सीताबर्डीतील मोबाईल शॉपी फोडली
By admin | Updated: July 12, 2015 23:56 IST
नागपूर : सीताबर्डीतील मोदी नंबर तीन मधील झी मॅजेस्टिक मोबाईल शॉपी फोडून चोरट्यांनी साडेनऊ लाखांचे मोबाईल लंपास केले. रविवारी सकाळी ८.३० वाजता ही घटना उघडकीस आली. जरीपटक्यातील हेमंत रमेश झुरानी (वय ३०) यांची मोदी नंबर तीनमध्ये मोबाईल शॉपी आहे. शनिवारी रात्री १०.४५ ला त्यांनी शॉपी बंद केली. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी शटर तोडून आत प्रवेश केला आणि विविध कंपनीचे १०० मोबाईल चोरून नेले. या मोबाईलची किंमत ९ लाख, ३६ हजार, ७०० रुपये आहे. झुरानी यांच्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.
सीताबर्डीतील मोबाईल शॉपी फोडली
नागपूर : सीताबर्डीतील मोदी नंबर तीन मधील झी मॅजेस्टिक मोबाईल शॉपी फोडून चोरट्यांनी साडेनऊ लाखांचे मोबाईल लंपास केले. रविवारी सकाळी ८.३० वाजता ही घटना उघडकीस आली. जरीपटक्यातील हेमंत रमेश झुरानी (वय ३०) यांची मोदी नंबर तीनमध्ये मोबाईल शॉपी आहे. शनिवारी रात्री १०.४५ ला त्यांनी शॉपी बंद केली. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी शटर तोडून आत प्रवेश केला आणि विविध कंपनीचे १०० मोबाईल चोरून नेले. या मोबाईलची किंमत ९ लाख, ३६ हजार, ७०० रुपये आहे. झुरानी यांच्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.---