शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
5
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
6
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
7
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
8
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
9
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
10
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
11
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
12
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
13
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
14
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
15
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
16
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
17
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
18
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
19
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
20
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा

‘मनरेगा’तून केले नदीचे पुनरुज्जीवन!

By admin | Updated: May 9, 2017 02:01 IST

केरळच्या अलापुझा जिल्ह्यातील बुधनूर ग्रामपंचायतीने त्यांच्या गावातील कुट्टमपेरूर या मृतप्राय झालेल्या नदीचे ‘मनरेगा’

लोकमत न्यूज नेटवर्कथिरुवनंतपूरम : केरळच्या अलापुझा जिल्ह्यातील बुधनूर ग्रामपंचायतीने त्यांच्या गावातील कुट्टमपेरूर या मृतप्राय झालेल्या नदीचे ‘मनरेगा’ योजनेच्या मजुरीतून पुनरुज्जीवन करून एक आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे. गरजूंना रोजगार देण्यासोबतच स्थानिक लोकांना लाभ होईल अशी स्थायी स्वरूपाची काम करण्याचा ‘मनरेगा’चा उद्देशही यामुळे सफल झाला आहे.बुधनूर पंचायतीचे प्रमुख अ‍ॅड. पी. विश्वंभर पन्निकर यांनी सांगितले की, कुट्टपेरूर नदीचे ‘मनरेगा’तून पुनरुज्जीवन करण्याचे डिसेंबर २०१६मध्ये ठरविण्यात आले. त्याच्या पुढच्या महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. ७०० गावकऱ्यांनी आणि प्रामुख्याने महिलांनी ३० हजार मानवी तास काम करून नदी पात्रातील सर्व गाळ, झाडेझुडपे व कचरा साफ केला आणि यंदाच्या २० मार्च रोजी नदीच्या संपूर्ण १२ किमीच्या पात्रात पुन्हा एकदा पाणी खळाळून वाहू लागले.मुख्य म्हणजे या कामासाठी कोणतीही यंत्रे वापरली गेली नाहीत. गावकऱ्यांसाठी हे केवळ रोजगासाठी केलेले काम नव्हते तर त्यामागे सामाजिक बांधिलकी होती. यातून नदीच्या रूपाने गावाने गमावलेला एक अमूल्य नैसर्गिक ठेवा पुन्हा प्राप्त करता आला, असे सांगून पन्निकर यांनी गावकऱ्यांचे सार्थ कौतुक केले.कुट्टमपेरूर ही अचनकोविल आणि पम्पा या दोन मुख्य नद्यांना जोडणारी उपनदी आहे. ती अचनकोविल येथे उगम पावते व एन्नाक्कड, बुधनूर, कुट्टमपेरूर, मन्नार आणि पंदानाड येथून वाहात जाऊन अखेरीस पथनामथिट्टा जिल्ह्यात परुमलाजवळ नक्किडा येथे पम्पा नदीला जाऊन मिळते. अचनकोविल आणि पम्पा या नद्यांच्या पुराचे नैसर्गिकरीत्या नियंत्रण करण्याचे काम कुट्टमपेरूर नदी करते.आटलेली नदी पुन्हा प्रवाहित करण्याचा विचार सर्वप्रथम सन २०१३ मध्ये पुढे आला. त्यानंतर सलग दोन वर्षे अपुऱ्या पावसाने पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली तेव्हा हा विषय अधिक निकडीने पुढे आला. पर्यावरणवादी, स्थानिक लोकप्रतिनिधी व स्वयंसेवी संस्थांनी अनेक पर्यायांवर विचार केला.