शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

सव्वा दोन कोटी निधी आमदारांनी पळविला जि.प.त तातडीची बैठक : पदाधिकार्‍यांचीही नाराजी; वरिष्ठांशी चर्चा

By admin | Updated: March 30, 2016 00:25 IST

जळगाव- जिल्हा परिषदेला जनसुविधा अंतर्गत विविध कामांसाठी जिल्हा नियोजन समितीकडून सव्वा दोन कोटी रुपये प्राप्त झाले. पण या निधीत १२ आमदारांनी प्रत्येकी १२ लाख आणि दोन खासदारांनी प्रत्येकी २४ लाख रुपये असे नियोजन करून हा निधी पळविला. याबाबत जि.प.च्या पदाधिकार्‍यांसह सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.

जळगाव- जिल्हा परिषदेला जनसुविधा अंतर्गत विविध कामांसाठी जिल्हा नियोजन समितीकडून सव्वा दोन कोटी रुपये प्राप्त झाले. पण या निधीत १२ आमदारांनी प्रत्येकी १२ लाख आणि दोन खासदारांनी प्रत्येकी २४ लाख रुपये असे नियोजन करून हा निधी पळविला. याबाबत जि.प.च्या पदाधिकार्‍यांसह सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.
जि.प.चे २० सदस्य जिल्हा नियोजन समितीमध्ये सदस्य आहेत. त्यांना न विचारता, सूचना न देता आमदार व खासदार यांनी परस्पर हा निधी वळता केल्याबाबत पदाधिकार्‍यांनीही नाराजी व्यक्त केली.
तातडीने घेतली बैठक
हा निधी मार्च एंडच्या धामधूमीत मागील आठवड्यात जि.प.ला मिळाला. पण कुणालाही कुठलीही सूचना न देता हा निधी कसा पळविला गेला याबाबत चर्चा करण्यासाठी जि.प.तील पदाधिकारी व सदस्यांनी मंगळवारी दुपारी बैठक घेतली. त्यात अध्यक्ष प्रयाग कोळी, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमलेंसह काही सदस्य व इतर पदाधिकारी सहभागी झाले. जि.प.च्या सदस्यांना आता १४ व्या वित्त आयोगातून निधी मिळणे बंद झाले आहे... जनसुविधा अंतर्गत नियोजन समितीने दिलेला निधीही पळविला जाईल तर सदस्यांनी कुठल्या निधीतून आपली कामे मार्गी लावावीत, मतदारांना काय सांगावे, असे प्रश्न काही सदस्यांनी उपस्थित केले.

प्रशासनाशी चर्चा
लागलीच जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्‍यांशीही जि.प.तील पदाधिकार्‍यांनी चर्चा केली. त्यात जि.प.त ६८ सदस्य आहेत. त्यांनाही जनसुविधा अंतर्गत निधी दिला जावा, अशी मागणी करण्यात आली. त्यावर जि.प.च्या सदस्यांनाही निधी दिला जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले.