शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

आमदाराच्या चालकाने पळवली अल्पवयीन मुलगी अपहरणाचा गुन्हा दाखल : लग्न करण्याचे दाखविले आमिष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2016 00:07 IST

जळगाव: आमदार सुरेश भोळे यांचा चालक असलेला पवन सोनार (रा.रामेश्वर कॉलनी) याने लग्नाचे आमिष दाखवून सतरा वर्षीय मुलीला पळवून नेल्याचा प्रकार घडला आहे. दरम्यान, मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिल्यावरुन पवनविरुध्द जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला शुक्रवारी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव: आमदार सुरेश भोळे यांचा चालक असलेला पवन सोनार (रा.रामेश्वर कॉलनी) याने लग्नाचे आमिष दाखवून सतरा वर्षीय मुलीला पळवून नेल्याचा प्रकार घडला आहे. दरम्यान, मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिल्यावरुन पवनविरुध्द जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला शुक्रवारी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील एका कॉलनीत सुरक्षा रक्षक असलेल्या फिर्यादीची मुलगी सातवी पास झालेली आहे. सध्या तिचे शिक्षण थांबविण्यात आले होते. पवन सोनार हा आमदार भोळे यांच्या वाहनावर चालक असल्याने त्याचे फिर्यादीच्या घरी येणे-जाणे होते. यादरम्यान दोघांमध्ये प्रेमसंबंध प्रस्थापित झाले. ही बाब मुलीच्या आई-वडिलांच्या गुरुवारी लक्षात आली. त्यानंतर त्याला घरी बोलावून मुलीपासून लांब राहण्याचे सांगण्यात आले. त्यावर पवन हा त्याचा मित्र जयेश पाटील याला घेऊन दारू पिऊन घरी आला व मुलीच्या भावाला धमकी देऊन निघून गेला.
रात्री झोपेतून गायब झाली मुलगी
गुरुवारी रात्री सर्वजण झोपल्यानंतर शुक्रवारी पहाटे पावणे चार वाजता आई ही पाणी पिण्यासाठी उठली असता मुलगी जागेवर दिसली नाही. तिचा परिसरात तसेच रेल्वे स्टेशन व बसस्थानकावर शोध घेतला असता ती सापडली नाही. पवन सोनार यानेच फुस लावून मुलगी पळविल्याची खात्री झाल्यानंतर मुलीच्या वडिलांनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली.

कोट..
पवन सोनार हा पूर्वी चालक म्हणून कामाला होता.सध्या माझ्याकडे नाही. सहा महिन्यापूर्वीच त्याने काम सोडले आहे. त्यामुळे त्याच्याशी संबंध नाही.
-सुरेश भोळे, आमदार