शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

किरकोळ कारणावरून मित्राचा केला खून

By admin | Updated: May 25, 2015 02:11 IST

दारूच्या नशेत कृत्य : दोघांना अटक

दारूच्या नशेत कृत्य : दोघांना अटक
लोणी काळभोर : कुर्‍हाड व्यवस्थित बनवून दिली नाही,या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसन भांडणात झाले व त्यातून २ जणांनी एकास लोखंडी गजाच्या सा‘ाने ठार मारले. ही घटना उघडकीस आल्यानंतर अवघ्या तासाच्या आत पोलिसांनी दोघांना जेरबंद केले.
या प्रकरणी मयताचे वडील सुरेश हरीभाऊ साळुंखे. (वय ४० वर्षे, रा. सिद्राममळा, पाण्याच्या टाकीजवळ, लोणी काळभोर. मूळ रा. कर्‍हा वाघज, ता. बारामती.) यांनी दिलेल्या फिर्याद दिली असून यामध्ये नागेश्वर सुरेश साळुंखे (वय १८ वर्षे) या तरुणाचा खून झाला आहे.
भानूदास हनुमंत लिंगे (वय २२ वर्षे) व संजय मुखहरी चव्हाण (वय ३० वर्षे, दोघे रा. सिद्र्राममळा, नांदेपाटील वस्ती, लोणी काळभोर) या दोघांना ताब्यात घेतले आहे.
साळुंखे कुटुंबाचा घिसाडी काम करण्याचा व्यवसाय असून काही दिवसांपूर्वी लिंगे याने नागेश्वरकडे एक कुर्‍हाड तयार करण्यासाठी दिली होती. ती व्यवस्थित तयार करून न दिल्याने लिंगे नागेश्वरवर नाराज होता.
शनिवार २३ मे रोजी नागेश्वर, लिंगे व चव्हाण या मित्रांनी अतिमद्यपान केले. दारू पिऊन झाल्यानंतर रात्री ८ वाजण्याच्या सुमारास कोणत्यातरी कारणांवरून चव्हाण व नागेश्वर या दोघांची बाचाबाची झाली. याचवेळी लिंगे याने कुर्‍हाडीचा विषय काढला. तिघांचा वाद वाढल्यानंतर लिंगे याने दुचाकीला अडकवलेला गज काढला व तो नागेश्वरच्या डाव्या कानाच्या मागील बाजूस व कपाळावर मारला. वर्मी घाव बसल्याने नागेश्वर खाली कोसळला. त्याला जखमी अवस्थेत सोडून दोघे घरी निघून गेले.
आज सकाळी हा प्रकार समजल्यानंतर पोलीस निरीक्षक अभिमान पवार व गुन्हे शोधपथक घटनास्थळी गेले. त्यावेळी त्यांना नागेश्वर मृतावस्थेत आढळून आला. चौकशी केली असता नागेश्वर सोबत भानूदास लिंगे व संजय चव्हाण असल्याची माहिती मिळताच दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, सदर खून आपणच केला असल्याची त्यांनी कबुली दिली.
घटनास्थळी पुणे विभागाचे अप्पर पोलीस अधिक्षक राजकुमार शिंदे, बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधिक्षक तान्हाजी चिखले व हवेलीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर वैशाली कडूकर यांनी भेट दिली. एक तासाच्या आत खुन्यांना जेरबंद केल्याबद्दल पोलीस निरीक्षक अभिमान पवार व गुन्हे शोधपथकाचे कौतुक केले. (वार्ताहर)
फोटो - घटनास्थळाची पाहणी करत असताना हवेलीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर वैशाली कडूकर, पोलीस निरीक्षक अभिमान पवार व गुन्हे शोधपथक.