शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीतील हॉटेल रूममध्ये अल्पवयीन जोडप्याची आत्महत्या

By admin | Updated: July 15, 2017 11:10 IST

दिल्लीतील द्वारका भागात असणाऱ्या एका हॉटेलच्या रूममध्ये अल्पवयीन जोडप्याने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली. दि. 15- दिल्लीतील द्वारका भागात असणाऱ्या एका हॉटेलच्या रूममध्ये अल्पवयीन जोडप्याने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेच्या प्राथमिक चौकशीनंतर अल्पवयीन जोडप्याने आत्महत्या केल्याचं म्हंटलं आहे. या अल्पवयीन जोडप्यातील मुलगा 17 वर्षाचा असून तो बारावीत शिकत होता तर मुलगी एमबीबीएसच्या पहिल्या वर्षात शिकत होती. ज्या हॉटेल रूममध्ये त्यांनी आत्महत्या केली ती रूम त्यांनी ओयो (OYO) अॅपद्वारे बूक केली होती. या रूममध्ये जबरदस्तीने घुसल्याचे कोणतेही निशाण पोलिसांना मिळाले नाहीत. या प्रकरणाच्या सर्व बाबींची तपासणी सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. पण या आत्महत्येचं कारण अजूनही अस्पष्ट आहे. द टाइम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली आहे. 
द्वारकाच्या सेक्टर 17मधील हॉटेलमध्ये गुरूवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास या दोघांनी चेक इन केलं होतं. त्यानंतर ते दोघंही त्याच रूममध्ये होते. दिल्ली पोलिसांना शुक्रवारी संध्याकाळी साडेपाच वाजता या प्रकरणाच्या तक्रारीसाठी फोन आला होता. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी बऱ्याचदा ते दोघं असलेल्या रूमची बेल वाजविली होती. पण दरवाजा न उघडल्याने, रूममध्ये काहीतरी घटना घडल्याचा संशय हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना आला होता. पोलीस अधिकारी सुरेंद्र कुमार यांच्या सांगण्यानुसार, हॉटेल स्टाफने रूमची अनेक वेळा बेल वाजवली पण कुणीही दरवाजा न उघडल्याने कर्मचाऱ्यांनी हॉटेल मॅनेजरला याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांना यासंबंधी कळविण्यात आलं. हॉटेलच्या तक्रारीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रूमचा दरवाजा उघडला. तेव्हा ते अल्पवयीन जोडपं पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडलं. 
आणखी वाचा
 

UPA सरकारला सरसंघचालकांचं नाव दहशतवाद्यांचं यादीत टाकायचं होतं?

तेजस्वींच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही - लालूप्रसाद यादव

गोरक्षेच्या नावे हिंसाचार करणारे नरभक्षक आहेत

दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी पुढचा तपास सुरू केला असून हॉटेलमध्ये चेकइन करताना दिलेले आयडी कार्ड पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. तसंच त्या दोघांच्या घरच्यांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली आहे. त्या दोघांनी दोरीने गळफास लावून आत्महत्या केली आहे. आत्महत्येची योजना दोघांनी आधीपासून केली असावी, असा अंदाज पोलीस व्यक्त करत आहेत. 

या घटनेतील अल्पवयीन मुलगा जनकपुरीचा राहणार असून तेथील एका खाजगी कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता. गुरूवारी क्लासला जाण्यासाठी घरातून निघाला आणि सेक्टर 17 मधील मेट्रो स्टेशनवर मुलीला भेटला. गुरूवारी मुलगा घरी न परतल्याने त्याच्या घरच्यांनी पोलिसात तक्रार केली होती.  हॉटेलमध्ये जमा केलेल्या आयडी कार्डच्या माध्यमातून त्या मुलीच्या घरच्यांची माहिती जमा केली जाते आहे. तसंच त्या दोघांचे मोबाइल पोलिसांनी जप्त केले असून कॉल डिटेल्स तपासले जात आहेत. 
कदाचित या दोघांचं प्रेमप्रकरण असून त्यांना सगळ्यांपासून लपवून ठेवायचं होतं, असं मत पोलिसांनी व्यक्त केलं आहे.