शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

देह व्यापाराच्या अड्ड्यावर सापडली अल्पवयीन मुलगी

By admin | Updated: September 22, 2016 01:16 IST

देह व्यापाराच्या अड्ड्यावर सापडली अल्पवयीन मुलगी

देह व्यापाराच्या अड्ड्यावर सापडली अल्पवयीन मुलगी
नागपूर : गुन्हे शाखा पोलिसांनी एका अल्पवयीन मुलीकडून देह व्यापार करवून घेणाऱ्या तीन आरोपींना पकडले.
पोलिसांना वैशालीनगर येथील नासुप्रच्या मैदानाजवळील एका घरात देह व्यापार चालत असल्याची माहिती मिळाली. बुधवारी सायंकाळी पोलिसांनी डमी ग्राहक पाठवला. देह व्यापार सुरु असल्याची खात्री पटल्यावर पोलिसांनी धाड टाकली. या अड्ड्याची प्रमुख नीलेश अंतू कुडकी आणि त्याची नातेवाईक सारिका बच्चू कुडकी यांना अटक केली. तसेच दोघांनाही ग्राहक उपलब्ध करून देणाऱ्या लालचंद खरपत यादव यालाही पकडले.
यादव हा नारळ पाणी विक्रीचा व्यवसाय करतो. नीलेश व सारिका घर भाड्याने घेऊन ग्राहकांना जागा उपलब्ध करून देत होते. दोघेही झारखंडचे राहणारे आहेत. त्यांच्याजवळ एक अल्पवयीन मुलगी सुद्धा सापडली. आरोपींच्या विरुद्ध पीटा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
निरीक्षक पंडित सोनवणे यांच्या मार्गदर्शनात हवालदार गोपाल वैद्य, नायक शिपाई मनोज सिंह चव्हाण, अजय ठाकूर प्रफुल्ल बोंद्रे यांनी ही कारवाई केली.
-----------------------
- मटका अड्ड्यावर धाड
नागपूर : सक्करदरा पोलिसांनी जुना बिडीपेठ येथे मटक्याच्या अड्ड्यावर धाड टाकून १७ आरोपींना पकडले.
पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती. या आधारावर बुधवारी सायंकाळी जुना बिडीपेठ येथील पायगवडीच्या घरावर धाड टाकण्यात आली. तेव्हा आरोपी मटका खेळतांना आढळून आले. तेथून रोख ६८७० रुपये, मोबाईल व ७ बाईकसह ३ लाख ४२ हजार रुपयाचा माल जप्त केला.
पोलिसांनी तेथून आकाश कोहड़ीकर, सचिन नितनवरे, सैयद वकील, साजिद खान, शेख जलील, अरुण वानखेड़े, शफीक अन्सारी, सुनील तुमाने, सैयद साबिर, बहादुर युवनाते, मनोज सोमकुवर, रामभाई पाटील, चरणदास गुडधे, अशोक, देशपांडे, अब्दुल सत्तार, गिरीश इंगोले आणि अनिल नखाते यांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.