शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्गांवरील स्पीड ब्रेकर्स हटवण्याचा रस्ते वाहतूक मंत्रालयाचा आदेश

By admin | Updated: April 15, 2016 13:35 IST

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने वाहतूक सुरळीत होण्यासाठी तसंच अपघात होण्यासाठी कारणीभूत ठरणा-या स्पीड ब्रेकरला राष्ट्रीय महामार्गांवरुन हटवण्याचा आदेश दिला आहे

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. १५ - केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने स्पीड ब्रेकर्स राष्ट्रीय महामार्गांवरुन हटवण्याचा आदेश दिला आहे. 
वाहतूक सुरळीत होण्यासाठी तसंच अपघातांची संख्या कमी करण्यासाठी हा आदेश देण्यात आला आहे. मंत्रालयाने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय), राज्यांचे सार्वजनिक बांधकाम मंत्रालय आणि सीमा रस्ते संघटनेला (बीआरओ) हे आदेश दिले आहेत.
 
रस्ते वाहतूक मंत्रालयाने सर्व विभागांना बुधवारपर्यंत आपल्या कामकाजाची माहिती देण्यास सांगितलं आहे. रस्ते अपघातासंबंधी मंत्रालयाने 2014 मध्ये अहवाल दिला होता.  अहवालानुसार 4726 लोकांनी रंगीत पट्ट्यांमुळे (हंप्स) झालेल्या अपघातात आपला जीव गमावला आहे. तर 6672 लोकांचा खड्डे आणि स्पीड ब्रेकरमुळे झालेल्या अपघातांमध्ये मृत्यू झाला आहे.
 
रस्ते वाहतूक मंत्रालयाने जारी केलेल्या परिपत्रकात स्थानिक प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. मार्गदर्शक तत्वे जारी केलेली असतानाही वाहनांचा वेग कमी कऱण्यासाठी स्पीड ब्रेकर बांधले जात असल्याचं म्हटलं आहे. यावर मंत्रालयाने आक्षेप घेतला आहे. राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत होणे अपेक्षित असतं. स्पीड ब्रेकरमुळे गंभीर अडथळा होऊन वेगाने जाणा-या वाहनांचा अपघात होऊ शकतो असं मत मंत्रालयाने व्यक्त केलं आहे. 
 
आंतरराष्ट्रीय रस्ते फेडरेशनचे चेअरमन कपिला यांनी हायवेवर स्पीड ब्रेकर नसावेत याचं समर्थन केलं आहे. पण काही हायवे गावातून जातात जिथे लोकांना पलीकडे जाण्यासाठी रस्ता ओलांडावा लागतो. त्यांच्यासाठी सुविधा उपलब्ध करण्याची गरज असल्याचंही कपिला बोलले आहेत.