लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन दिवसांवर येऊन ठेपलेले असताना मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी काल मंगळवारी रात्री तडकाफडकी आपल्या ११ मंत्र्यांच्या खात्यांमध्ये फेरबदल केला़ बदायूँ सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरण तसेच त्यानंतरच्या हिंसाचारावरून उत्तर प्रदेश सरकारवर चौफेर टीका होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही खांदेपालट करण्यात आली.यासंदर्भात रात्री उशिरा अधिसूचना जारी केली गेली़ बलराम यादव यांच्याकडून पंचायतराज काढून त्यांना कारागृहमंत्री बनविण्यात आले़ ते राजेंद्र चौधरी यांची जागा घेतील़ राजेंद्र चौधरी यांना राजनीतिक पेन्शन खाते देण्यात आले़ क्रीडा व युवा कल्याणमंत्री नारद रॉय यांना खादी व ग्रामोद्योग खाते देण्यात आले़ उद्या शुक्रवारपासून विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे़ तत्पूर्वी करण्यात आलेल्या या खांदेपालटाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत़ (वृत्तसंस्था)
यूपीत मंत्र्यांची खांदेपालट
By admin | Updated: June 19, 2014 03:56 IST