शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

लैंगिक छळ रोखण्यासाठी मंत्रीगट; प्रमुख अमित शहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 04:19 IST

सीतारामन, पोखरियाल, स्मृती इराणी सदस्य

नवी दिल्ली : कामाच्या ठिकाणी महिला कर्मचाऱ्यांचा होणारा लैंगिक छळ थांबविण्यासाठी, तसेच त्याबद्दलचे कायदे अधिक कडक करण्याकरिता नेमलेल्या मंत्रीगटाची केंद्र सरकारने फेररचना केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आता या मंत्रीगटाचे प्रमुख असणार आहेत.

याआधी राजनाथसिंह गृहमंत्री असताना ते या मंत्रीगटाचे प्रमुख होते. फेररचना केलेल्या मंत्रीगटात वित्तमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक, केंद्रीय बालविकास खात्याच्या मंत्री स्मृती इराणी यांचा सदस्य म्हणून समावेश केला आहे. याआधीच्या मंत्रीगटात तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, महिला व बालविकास खात्याच्या मंत्री मनेका गांधी यांचा समावेश होता.कामाच्या ठिकाणी महिलांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यांना मानसिक त्रास व लैंगिक छळाला सामोरे जावे लागते. हे सर्व प्रकार रोखण्यासाठी उपाययोजना सुचविण्याकरिता केंद्र सरकारने एका मंत्रीगटाची आॅक्टोबर २०१८ मध्ये स्थापना केली होती. कायदे करूनही हे प्रकार कमी होण्याचे चिन्ह नाही. कायद्याच्या बडग्याबरोबरच समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी कोणती पावले उचलता येतील यावरदेखील या मंत्रीगटातील सदस्य विचार करतात.

लोकसभा निवडणुकांत मिळालेल्या विजयामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा दुसरा कार्यकाळ सुरू झाला आहे. केंद्रात नव्याने सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रीगट, समित्यांची फेररचना केली जाते. अमित शहा प्रमुख असलेल्या या मंत्रीगटाच्या सदस्यांची लवकरच बैठक बोलावणार आहे. कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ रोखण्यासाठी सुचविण्यात आलेल्या उपाययोजनांवर या बैठकीत चर्चा केली जाईल, असे केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले.