शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

सैन्यदल कमजोर नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 04:14 IST

आता २०१३सारखी परिस्थिती राहिलेली नाही. भारत पूर्णपणे संरक्षण सिद्ध आहे. आपले सैन्यदले कमजोर नाहीत, अशी ग्वाही संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी राज्यसभेत दिली.

नवी दिल्ली : आता २०१३सारखी परिस्थिती राहिलेली नाही. भारत पूर्णपणे संरक्षण सिद्ध आहे. आपले सैन्यदले कमजोर नाहीत, अशी ग्वाही संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी राज्यसभेत दिली.मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून देशात पूर्णवेळ संरक्षण मंत्री नाही. मनोहर पर्रिकरांकडे संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी सोपवली तर ते निष्क्रिय ठरले. सीमेवर खरोखर युध्द झाले तर केवळ १0 दिवस पुरेल इतका दारूगोळा शिल्लक असल्याचे भारताचे महालेखापाल (सीएजी) यांच्या अहवालात म्हंटले आहे. भारताच्या दोन्ही सीमांवर तणाव आहे, अशा स्थितीत भारताची संरक्षण सिध्दता नेमकी कोणत्या अवस्थेत आहे? शून्यप्रहरात हा सवाल काँग्रेसचे आनंद शर्मा आणि रामगोपाल यादव यांनी राज्यसभेत उपस्थित केला.संरक्षण मंत्री अरूण जेटली त्यावर म्हणाले, महालेखापालांच्या ज्या अहवालाचा सभागृहात उल्लेख झाला तो अहवाल २0१३ सालचा आहे. २0१३ च्या अहवालात सीएजीने संरक्षण सिध्दतेबाबत ज्या शंका उपस्थित केल्या त्या विशिष्ठ कालावधीपुरत्या सीमित होत्या. त्यानंतर या संदर्भात आणखी एक अहवाल आला आहे. त्याचीही चर्चा लोकलेखा समितीत होईलच. तथापि सभागृहाला मी आश्वस्थ करू इच्छितो की २0१३ नंतर संरक्षण सिध्दतेची स्थिती बºयापैकी सुधारली आहे. संरक्षण खरेदी व्यवस्थेत व्यापक विकेंद्रीकरण झाले. खरेदी प्रक्रियेचे सुलभीकरण झाले. या सुधारणांमुळे आपल्या तिन्ही सैन्यदलांकडे पुरेशी संरक्षण सिध्दता आजमितीला आहे.राज्यसभेत शून्यप्रहरात समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव यांनी कॅग अहवालाचा उल्लेख करीत सरकारच्या संरक्षण सिध्दतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, ‘भारताच्या दोन्ही सीमांवर सध्या तणावाची स्थिती आहे. सीएजी (कॅग) च्या अहवालानुसार केवळ १0 दिवस पुरेल इतकाच दारूगोळा सैन्यदलाकडे शिल्लक आहे. बोफोर्स प्रकरणानंतर तमाम अधिकारी इतके भयग्रस्त आहेत की संरक्षण खरेदी व्यवहारांच्या दस्तऐवजांवर स्वाक्षºया करायलाही घाबरतात.काँग्रेसचे उपनेते आनंद शर्मा म्हणाले, भारताच्या संरक्षण सिध्दतेबाबत कॅग अहवालाची विस्ताराने चर्चा लोकलेखा समितीत होईल, इतके मर्यादीत उत्तर संरक्षण मंत्र्यांकडून अपेक्षित नाही. संरक्षण खरेदी व्यवस्था सोपी आणि सरळ करण्यासाठी सरकारने नेमक्या कोणत्या सुधारणा तीन वर्षात केल्या याचे उत्तर सभागृहाला हवे आहे.भारताने सैन्य माघारी घेणे हाच सोपा उपायसिक्कीम सेक्टरमधील वादग्रस्त डोकलाम भागातून भारताने त्याचे सैन्य जाणीवपूर्वक माघारी घेणे हा गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या वादावरील सोपा उपाय आहे, असे चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी म्हटले. सीमेवरील निर्माण झालेली कुंठितावस्था संपवण्याची जबाबदारी भारतावर टाकून वांग यांनी चीनच्या हद्दीत भारताने प्रवेश केल्याचे भारताने कबूल केले, असा दावा केला. डोकलामच्या मुद्यावर प्रथमच चीनच्या वरिष्ठ नेत्याने भाष्य केले आहे.डोकलाम भागात रस्ते बांधण्यास चीनला भारताने थांबवले आहे. चीनने मात्र आम्ही आमच्याच हद्दीत रस्ते बांधत असल्याचा दावा करून भारताने तत्काळ सैन्य मागे घ्यावे अशी मागणी केली. सुषमा स्वराज यांनी संसदेत गुरुवारी बोलताना दोन्ही देशांनी चर्चेसाठी आधी सैन्य माघारी घेऊन शांततापूर्ण उत्तर शोधावे, असे म्हटले होते.