शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

म्हादईप्रश्नी कर्नाटक एकाकी

By admin | Updated: September 13, 2015 04:01 IST

म्हादई पाणी तंटाप्रश्नी गोवा आणि महाराष्ट्राची जणू युती झाली आहे. या प्रश्नावर कर्नाटकला या दोन्ही राज्यांनी एकटे पाडल्याचे स्पष्ट झाले आहे. गोवा व महाराष्ट्रात भाजपाचे आघाडी सरकार,

- सद्गुरू पाटील,  पणजीम्हादई पाणी तंटाप्रश्नी गोवा आणि महाराष्ट्राची जणू युती झाली आहे. या प्रश्नावर कर्नाटकला या दोन्ही राज्यांनी एकटे पाडल्याचे स्पष्ट झाले आहे. गोवा व महाराष्ट्रात भाजपाचे आघाडी सरकार, तर कर्नाटकमध्ये काँग्रेस पक्षाचे सरकार अधिकारावर असल्याने साहजिकच त्यांच्यात सामंजस्य आहे. कर्नाटकमध्ये उगम पावणारी म्हादई नदी गोवा आणि महाराष्ट्रामधून वाहते. या नदीचा बहुतांश भाग गोव्यात आहे. पणजीत याच नदीला मांडवी म्हणून ओळखले जाते. कर्नाटक सरकार धरणे बांधून म्हादई नदीचे पाणी वळवू पाहात आहे. त्यासाठी सुमारे साडेतीन हजार कोटी रुपयांची योजना कर्नाटकने आखली आहे. तथापि, कर्नाटकने पाणी वळविले तर गोव्यातील मांडवी नदी, येथील कृषी संस्कृती, पाणी पुरवठा प्रकल्प, म्हादईच्या खोऱ्यातील जीवसृष्टी, जैवविविधता हे सारे धोक्यात येईल, अशी भीती म्हादई बचाव अभियानाचे नेते राजेंद्र केरकर यांनी व्यक्त केली. गोव्याचे अ‍ॅडव्होकेट जनरल आत्माराम नाडकर्णी यांनीही केरकर यांच्या भूमिकेशी सहमती दर्शवली आहे. म्हादई नदीच्या पाण्यावरून निर्माण झालेला गोवा व कर्नाटकमधील वाद पाणीतंटा लवादासमोर आहे. तेथे युक्तिवाद सुरू असून, हा विषय निर्णायक टप्प्यावर आला आहे. महाराष्ट्र सरकारलाही या वादात प्रतिवादी करण्यात आले आहे. मात्र आपली बाजू लंगडी पडली असल्याची कल्पना कर्नाटकला आहे. त्यामुळे कर्नाटकने लोकांना पिण्याच्या पाण्याची गरज असल्याचा मुद्दा पुढे करून चर्चेद्वारे हा वाद सोडवू या, अशी भूमिका आता तब्बल १० वर्षांनंतर घेतली आहे.लवादासमोर निर्णय नको, तिन्ही राज्यांनी चर्चा करून तोडगा काढावा, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री एस. सिद्धरामय्या व तेथील अनेक भाजपा नेत्यांनाही आता वाटते. त्यामुळेच त्यांनी गेल्या आठवड्यात एक शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे नेले होते. शक्य असेल तर चर्चेद्वारे तोडगा काढण्यास पंतप्रधानही अनुकूल आहेत, असा कर्नाटकचा दावा आहे. कर्नाटकमधील धारवाड भागातील वकिलांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची गोव्यात भेट घेतली व म्हादईप्रश्नी चर्चेद्वारे तोडगा काढण्याचे आवाहन केले. पार्सेकर यांनी अर्थातच त्यांची मागणी फेटाळली. लवादासमोरच काय तो निवाडा होऊ द्या, असे गोवा आणि महाराष्ट्रालाही वाटते. त्यामुळे कर्नाटक एकाकी पडले आहे. कर्नाटकच्या नेत्यांनीही मुख्यमंत्री पार्सेकर यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली होती; पण पार्सेकर यांनी वेळ दिली नाही.