शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
5
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
6
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
7
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
8
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
9
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
10
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
11
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
12
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
13
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
14
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
15
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
16
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
17
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
18
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
19
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
20
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...

मेट्रो-३चे कारडेपो कांजूरमार्गला? तज्ञ समितीचा शासनाकडे अहवाल सादर आरे कॉलनीतील वृश्रतोड टळणार

By admin | Updated: August 12, 2015 23:54 IST

मेट्रो-३चे कारडेपो कांजूरमार्गला?

मेट्रो-३चे कारडेपो कांजूरमार्गला?
तज्ञ समितीचा शासनाकडे अहवाल सादर
आरे कॉलनीतील वृश्रतोड टळणार
जमीर काझी/मुंबई : आरे कॉलनीतील मेट्रो-३च्या नियोजित कार डेपोला होत असलेल्या विरोधापुढे राज्य शासन सपशेल माघार घेण्याच्या निर्णयाप्रत पोहचले आहे. याबाबत नेमलेल्या तज्ञांच्या समितीने आरे कॉलनीऐवजी कांजूरमार्ग येथील भूखंडावर कारडेपो बनविण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे जोगेश्वरी-विक्रोळी आणि पूर्व महामार्गाच्या मध्यावर असलेल्या याठिकाणाहून कुलाबा-वांद्रे सिप्झ ही मेट्रो धावण्याची चिन्हे आहेत.
समितीने बुधवारी नगरविकास विभागाकडे सादर केलेल्या अहवालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच अंतिम निर्णय घेतील, असे विभागातील सूत्रांनी सांगितले. सुमारे ३३.५ किलो मीटर लांबीच्या पूर्णपणे भूमिगत मेट्रो-३चे कारडेपो गोरेगावातील आरे कॉलनीत निि›त करण्यात आले होते. मात्र त्याला पर्यावरणवादी, स्थानिक नागरिक आणि राजकीय पक्षांनी तीव्र विरोध केला होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मार्च महिन्यात याबाबत तज्ञांची अभ्यास समिती नेमली होती.
समितीच्या सूचनेनुसार ठिकाण कांजूरमार्ग येथे निि›त केल्यास मेट्रो-३ च्या नियोजित अंतरामध्ये सहा किलोमीटर अंतर वाढणार आहे. त्यासाठी आय.आय.टी पवईपर्यंत स्वतंत्र एक स्थानकही बनविले जाईल. त्यामुळे प्रकल्पाचा खर्च १ हजार ८०० कोटी रुपयांवरून २ हजार कोटींपर्यंत वाढण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. या प्रकल्पासाठी जपानमधील जपान आंतरराष्ट्रीय को-ऑपरेशन एजन्सी (जेआयसीआय) या कंपनीने अर्थसहाय्य केले आहे. त्याबाबत दोन्ही देशांमध्ये सामंजस्य करार झाला आहे.
मुंबई मेट्रोच्या प्राथमिक नियोजनानुसार सिप्झ ते कांजूरमार्ग हा मेट्रोचा सहावा मार्ग करण्याबाबत शासन गांभिर्याने विचार करीत आहे. त्यामुळे त्याबाबतच्या विस्तारीत मार्गाची निविदा मागविण्याच्या प्रक्रियेला आणखी काही काळ लागणार आहे. त्यासाठी स्वतंत्रपणे करार केले जातील, असेही एका अधिकार्‍याने स्पष्ट केले.
अभ्यास समितीमध्ये एमएमआरडीएचे महानगर आयुक्त, मुंबई महापालिकचे आयुक्त, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांच्यासह राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संस्थेचे संचालक डॉ. राकेश कुमार, सेंटर फॉर सायन्स आय.आय.टी. पवईच्या संचालिका डॉ. रश्मी पाटील, रवि सिन्हा आणि दिल्ली मेट्रो कार्पोरेशनचे संचालक बलविंदर कुमार यांचा समावेश होता.
............................
आरे कॉलनीत नियोजित कारडेपोला पर्याय म्हणून बॅकबे रिक्लेमेशन, कांजूरमार्ग, वडाळा, बीकेसी, कलिना येथील मुंबई विद्यापीठाची जागा याबाबत विचार करण्यात आला. मात्र, बॅकबे रिक्लेमेशनजवळील जागेवर पूर्वीपासून आरक्षण असल्याने कांजूरमार्गची जागा समितीने निि›त केल्याचे सांगण्यात आले.
............................
मेट्रो-३च्या पहिल्या नियोजित रचेनेनुसार आरे कॉलनीत कार डेपो बनविण्यासाठी २ हजार २९८ झाडांचा अडसर होता. त्यामध्ये २५४ वृक्ष मुळापासून तोडावे लागणार होते. तर उर्वरित अन्य ठिकाणी रोवले जाणार होते.
.................