शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मेटा आणि सीबीएसई यांचा भारतातील सहयोगाचा विस्तार; शिक्षणाचे लोकशाहीकरण होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2021 16:31 IST

पुढील ३ वर्षांच्या काळात भागीदारीतून १ कोटी विद्यार्थी आणि १० लाख शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) २०२० शी सुसंगत सर्वांगीण तंत्रज्ञान आणि डिजिटल नागरिकत्व यांचा वापर शक्य होणार

नवी दिल्ली: मेटाच्या फ्युएल फॉर इंडिया २०२१ मध्ये मेटाचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी कंपनी सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (सीबीएसई) सोबत भागीदारी करून भारतातील १ कोटीपेक्षा जास्त विद्यार्थी आणि १० लाख शिक्षकांना डिजिटल सुरक्षा आणि ऑनलाइन आरोग्य आणि ऑगमेंटेड रिअलिटी (एआर) बाबत अभ्यासक्रम देणार असल्याची घोषणा केली आहे. याशिवाय, सरकारच्या शिक्षणाच्या वैश्विकीकरणाच्या धोरणाला अनुसरून मेटा आणि सीबीएसई विद्यार्थ्यांना सीबीएसईच्या वेबसाइटवर दर्जेदार शैक्षणिक साहित्य ऑनलाइन उपलब्ध करून हायस्कूल शिक्षणाचे लोकशाहीकरण करणार आहे.एफबी फॉर एज्युकेशनच्या पहिल्या टप्प्याला जून २०२० मध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांना कामाच्या भविष्यासाठी तयार करण्याच्या तसेच सुरक्षित ऑनलाइन आणि अध्ययन अनुभव देण्याच्या हेतूने सुरूवात झाली असून जवळपास ५००,००० विद्यार्थ्यांनी डिजिटल सुरक्षा आणि ऑनलाइन आरोग्याला प्राधान्य दिले आहे आणि १४,००० पेक्षा अधिक शिक्षकांनी ऑगमेंटेड रिअलिटीच्या प्रशिक्षणासाठी नोंदणी केली आहे. पुढील ३ वर्षांसाठी भागीदारीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरूवात करताना निवडक मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी इंडिया इंटरनॅशनल सेंटर, नवी दिल्ली येथे एज्युकेटर्स राऊंड टेबलमध्ये २ नोव्हेंबर २०२१ रोजी सहभाग घेतला आणि त्यानंतर १ डिसेंबर २०२१ रोजी एका वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ५,००० पेक्षा अधिक शिक्षकांनी डिजिटल आरोग्य, डिजिटल नागरिकत्व आणि एआर/ व्हीआरचा वापर करून सखोल स्टेम शिक्षणाबाबत चर्चा केली.सीबीएसईसोबतची भागीदारी मेटाच्या भारताबाबत वचनबद्धतेला अधोरेखित करते आणि स्टेम एज्युकेशनला वैश्विक करण्याच्या संयुक्त महत्त्वाकांक्षा दर्शवते. त्यातून भारतभरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक साहित्यापर्यंत समानतेने पोहोचता येईल आणि त्यामुळे त्यांना डिजिटल सक्षमीकृत अर्थव्यवस्थेत फ्युचर ऑफ वर्कसाठी तयार होता येईल. या भागीदारीचे उद्दिष्ट शिक्षकांना जनरेशन झेड आणि जनरेशन अल्फा विद्यार्थ्यांना जबाबदार डिजिटल नागरिक बनवण्यासाठी नवीन युगातील साहित्याने तसेच कौशल्यांनी सज्ज करण्याचेही आहे.  नॅशनल एज्युकेशन पॉलिसी (एनईपी) २०२० शी सुसंगत राहून मेटा आणि सीबीएसई विद्यार्थ्यांसाठी इमर्सिव्ह तंत्रज्ञान, ऑगमेंटेड रिअलिटी (एआर) आणि व्हर्चुअल रिअलिटी (व्हीआर) हे कौशल्य विषय म्हणून आणून बदलत्या डिजिटल विश्वात बदलण्यासाठी सुसंगत साहित्य निर्मिती आणि अभ्यासक्रम तयार करतील. ऑगमेंटेड रिअलिटी अनुभव अभ्यासक्रमात समाविष्ट करून विद्यार्थ्यांना भविष्याच्या उगवत्या तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक कार्यक्षमतेने सहभागी होता येईल आणि निर्मिती करता येईल. इमर्सिव्ह एज्युकेशनमुळे विद्यार्थ्यांना विविध अध्ययन आव्हानांचा सामना करणे आणि तसेच प्रयोगशाळा माध्यमांच्या अभावाच्या स्थितीतही अत्यंत उत्तमरित्या शिकणे शक्य होईल. सीबीएसई भारतातील कमी सेवा मिळालेल्या प्रदेशातील विद्यार्थ्यांना आपल्या समुदाय कौशल्य केंद्रांद्वारे सक्षम करण्याचे उद्दिष्ट ठेवेल. ते ही नव्या युगाची कौशल्ये तरूणांसाठी उपलब्ध करतील आणि त्यांना स्त्रोत एकसमान पद्धतीने उपलब्ध करून देऊन डिजिटल अर्थव्यवस्थेत निर्माते होता येईल. या सहयोगाबाबत बोलताना सीबीएसईचे संचालक (कौशल्य शिक्षण आणि प्रशिक्षण) डॉ. विश्वजीत साहा म्हणाले की, ''या जागतिक साथीने संपूर्ण जगभरात आयुष्यांवर प्रभाव टाकला आहे. अध्ययन प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर बदल झाले आहेत. या मोठ्या बदलांनी अध्ययन प्रक्रियेत मोठी आव्हाने निर्माण केली आहेत. मेटाच्या सहकार्याने आम्ही आमच्या ऑनलाइन शिक्षण आणि अभ्यासक्रमाच्या क्षमतांची उभारणी करून त्यांना देशभरातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नात आहोत. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्याला मिळालेला प्रतिसाद प्रोत्साहक होता आणि त्यामुळे आम्हाला या भागीदारीची व्याप्ती वाढवण्यासाठीही प्रोत्साहन मिळाले आहे. ही भागीदारी आमच्या शिक्षकांना विद्यार्थी सहभागासाठी ऑनलाइन साधनांचा प्रभावशाली पद्धतीने वापर करण्यासाठी प्रशिक्षित करेल. डिजिटल इंडियाचे युग सुरू झाले आहे हे समजून घेताना आम्ही अभ्यासक्रमात डिजिटल सिटिझनशिप आणि ऑगमेंटेड रिअलिटी आणून आणि सर्वांसाठी दर्जेदार शैक्षणिक साहित्य देऊन जबाबदार डिजिटल नागरिक घडवण्याचे उद्दिष्ट समोर ठेवतो.''फेसबुक इंडियाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अजित मोहन म्हणाले की, “भारताच्या डिजिटल प्रवासाबाबत उत्साही आणि प्रयत्नशील असलेली कंपनी म्हणून आम्ही शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांनाही एक अधिक सर्वसमावेशक आणि समकक्ष पर्यावरण देण्यासाठी दर्जेदार डिजिटल साधने सहजसाध्य पद्धतीने देण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही सीबीएसईसोबत सर्वांसाठी शिक्षणाचे लोकशाहीकरण करण्यासाठी एकत्र आलो आहोत. आमचा विश्वास आहे की, दर्जेदार ऑनलाइन शैक्षणिक स्त्रोत आणि एआरच्या स्वरूपात देशाच्या तरूणांना नवीन तंत्रज्ञान दिल्याने त्यांच्या अध्ययनाच्या प्रवासात क्रांतीकारक बदल घडून येतील.”

टॅग्स :Metaमेटा