भांडारकर व चौधरी यांना निरोप
By admin | Updated: July 31, 2015 22:25 IST
नागपूर : जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत )वासुदेव भांडारकर व शिक्षणाधिकारी (प्रा.)किेशोर चौधरी आज शुक्रवारी सेवानिवृत्त झाले. या निमित्ताने कास्ट्राईब जि.प.कर्मचारी संघटनेतर्फे आयोजित कार्यक्रमात संघटनेचे जिल्हाध्यक्ष सोहन चवरे, सचिव नरेंद्र धनविजय व जगन्नाथ सोरते आदींनी त्यांना शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊ न भावपूर्ण निरोप दिला.अध्यक्षस्थायी उपायुक्त ...
भांडारकर व चौधरी यांना निरोप
नागपूर : जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत )वासुदेव भांडारकर व शिक्षणाधिकारी (प्रा.)किेशोर चौधरी आज शुक्रवारी सेवानिवृत्त झाले. या निमित्ताने कास्ट्राईब जि.प.कर्मचारी संघटनेतर्फे आयोजित कार्यक्रमात संघटनेचे जिल्हाध्यक्ष सोहन चवरे, सचिव नरेंद्र धनविजय व जगन्नाथ सोरते आदींनी त्यांना शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊ न भावपूर्ण निरोप दिला.अध्यक्षस्थायी उपायुक्त (आस्थापना)डॉ. कमलकिशोर फुटाणे, प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंदरे, यांच्यासह पंचायत व शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. भांडारकर व चौधरी यांनी निवृत्तीनंतर सामाजिक कार्य करण्याचा मनोदय व्यक्त केला. यावेळी प्रभाकर वाघ, राजू जगताप, प्रभाकर आवारी, महेश राऊ त, जगन्न्नाथ सोरते, चंद्रशेखर वैद्य, वसंत वसू, चंद्रशेखर जुमडे, ओंकार मेश्राम, बी.के.खोब्रागडे, विजय कोकडे यांच्यासह कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)