शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

एलियन्ससाठी संदेश; १० लाख डॉलरचे बक्षीस

By admin | Updated: July 29, 2015 01:54 IST

एलियन्स किंवा परग्रहवासीयांच्या शोधासाठी १०० दशलक्ष डॉलर खर्च करणारे रशियन उद्योगपती युरी मिल्नर यांनी परग्रहावर राहणाऱ्या या नागरिकांना पाठविण्यासाठी उत्कृष्ट संदेश तयार करणाऱ्या

लंडन : एलियन्स किंवा परग्रहवासीयांच्या शोधासाठी १०० दशलक्ष डॉलर खर्च करणारे रशियन उद्योगपती युरी मिल्नर यांनी परग्रहावर राहणाऱ्या या नागरिकांना पाठविण्यासाठी उत्कृष्ट संदेश तयार करणाऱ्या व्यक्तीला १० लाख डॉलरचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. फ्रँक ड्रेक हे अंतराळवीर १९६० पासून एलियन्सचा शोध घेत असून, त्यांच्या म्हणण्यानुसार या स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी हा संदेश मानवी भाषेत लिहिल्यास तो रद्द केला जाईल. काही लोक इंग्रजी भाषेत संदेश तयार करत आहेत, पण ही मोठीच चूक आहे. ड्रेक यांनी आधी आंतरग्रहीय संदेश तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी तयार केलेला हा संदेश पायोनियर व व्हॉयेजर अवकाश यानावर कोरलेला आहे. ही याने आता पृथ्वीपासून सुदूर अंतरावर असणारे पहिले मानवी पदार्थ आहेत. आपण आता पाठविलेला संदेश परग्रहावरील एलियन्सना पोहोचण्यासाठी हजार वर्षे लागतील. तो संदेश घेणाऱ्या मानवांना समजेल असाच संदेश आपल्याला पाठवावा लागणार आहे. आपण त्यांना आम्हाला तुमच्याशी मैत्री करायची आहे असा संदेश दिला तर एलियन्स निराश होतील. लंडनच्या रॉयल सोसायटीत काम करणारे प्रख्यात शास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंग हे एलियन्सचा शोध घेण्याची १०० दशलक्ष डॉलरची मोहीम राबवत आहेत. पृथ्वीच्या बाहेरच्या विश्वात एलियन्सचा शोध घेण्याकरिता हाती घेण्यात आलेली ही सर्वात मोठी वैज्ञानिक मोहीम मानण्यात येत आहे. (वृत्तसंस्था)काय करता येईल?- एलियन्सना संदेश पाठविण्यासाठी त्यांच्यात व आपल्यात काय समान आहे याचा विचार केला पाहिजे. रसायनशास्त्राचा विचार केल्यास काही रेषा ओढून आपण त्यांना विविध धातू दाखवू शकतो. प्रकाशाचा उल्लेख एखाद्या चित्रमितीतून करू शकतो. - पल्सर किरणेही आपल्या दोघात समान असू शकतात. जगाची दीपगृहे म्हणून ओळखले जाणारे पल्सर तारे, न्यूट्रॉन तारे किरणोत्सर्ग करतात, त्यांचा वापर या संदेशात करता येईल, असे ड्रेक यांनी म्हटले आहे.