मनपाचा शिक्षक निलंबित
By admin | Updated: February 13, 2015 00:38 IST
- विद्यार्थिनीशी छेडछाड प्रकरण : पोलिसातही तक्रारनागपूर : विद्यार्थिनीच्या घरात शिरून तिच्याशी अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकास महापालिका प्रशासनाने निलंबित केले आहे. सोबतच कळमना पोलिसातही तक्रार करण्यात आली आहे. देवराव गजाम असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. संबंधित घटना ३ जानेवारी रोजीची आहे. महापालिकेच्या पारडी मराठी उच्च प्राथमिक शाळेतील आठव्या ...
मनपाचा शिक्षक निलंबित
- विद्यार्थिनीशी छेडछाड प्रकरण : पोलिसातही तक्रारनागपूर : विद्यार्थिनीच्या घरात शिरून तिच्याशी अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकास महापालिका प्रशासनाने निलंबित केले आहे. सोबतच कळमना पोलिसातही तक्रार करण्यात आली आहे. देवराव गजाम असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. संबंधित घटना ३ जानेवारी रोजीची आहे. महापालिकेच्या पारडी मराठी उच्च प्राथमिक शाळेतील आठव्या वर्गातील विद्यार्थिनी शाळा सुटल्यानंतर घरी गेली. शिक्षक देवराव गजाम तिचा पाठलाग करीत तिच्या घरी गेला. घरात कुणीही नसल्याचे बघून तिच्याशी अश्लील चाळे केले व तिला धमकावले. दुसऱ्या दिवशीही या नराधमाने या संतापजनक प्रकाराची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न केला. अखेर या विद्यार्थिनीने वर्गमैत्रिणींना हा प्रकार सांगितला. याप्रकरणी ५ जानेवारी रोजी लगेच शिक्षिकेलाही माहिती देण्यात आली. शिक्षिकेने मुख्याध्यापकांना घडला प्रकार सांगितला. मुख्याध्यापकाने मुलीच्या आईची भेट घेऊन पोलिसांत तक्र ार केली. मुख्याध्यापकांनी प्रशासनालाही याप्रकरणी माहिती दिली. अखेर आज महापालिका प्रशासनाने देवराज गजाम याला तत्काळ निलंबित केले.