सातपूर येथील सेंट्रल गोदावरी बॅँकेसमोर सभासदांचे उपोषण
By admin | Updated: September 7, 2015 23:27 IST
सातपूर : तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकर्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सेंट्रल बॅँकेने सेंट्रल गोदावरी कृषक सेवा सहकारी संस्थेला वित्त पुरवठा करावा या मागणीसाठी संस्थेच्या संचालक मंडळासह सभासद शेतकर्यांनी बॅँकेच्या सातपूर येथील मुख्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे.
सातपूर येथील सेंट्रल गोदावरी बॅँकेसमोर सभासदांचे उपोषण
सातपूर : तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकर्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सेंट्रल बॅँकेने सेंट्रल गोदावरी कृषक सेवा सहकारी संस्थेला वित्त पुरवठा करावा या मागणीसाठी संस्थेच्या संचालक मंडळासह सभासद शेतकर्यांनी बॅँकेच्या सातपूर येथील मुख्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. नाशिक तालुक्यातील शेतकर्यांच्या शेतीसाठी कर्ज पुरवठा करण्यात यावा म्हणून सेंट्रल बॅँकेने सेंट्रल गोदावरी कृषक सेवा सहकारी संस्थेची स्थापना केली. या संस्थेचे पाच हजार सभासद आहेत. या संस्थेला दरवर्षी बँकेकडून २५ कोटी रुपयांचा वित्त पुरवठा केला जातो. यावर्षी संस्थेने बॅँकेकडे २३ कोटी रुपयांची मागणी केली आहे, तर बॅँकेने फक्त ११ कोटी रुपये मंजूर केले. उर्वरित शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून, त्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी बॅँकेने वित्त पुरवठा करावा म्हणून संचालक मंडळाने वारंवार पाठपुरावा करूनही बॅँकेने दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत संचालक मंडळाने बँकेने समोर साखळी उपोषण सुरू केले आहे. याप्रसंगी बॅँकेचे अध्यक्ष अनिता चव्हाण, उपाध्यक्ष अनिल काकड, दिनकर पाटील, तानाजी पिंगळे, पंडित कातड पाटील, मधुकर खांडबहाले, अरुण पाटील, पुंजाराम थेटे, ज्ञानेश्वर वाघ, रामदास पिंगळे, संदीप पाटील, हिरामण बेंडकुळे, दौलत पाटील, शीला पाटील आदि संचालक उपोषणास बसले आहेत. (वार्ताहर)