शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

यूपीएकडून राष्ट्रपतीपदासाठी मीरा कुमार यांना उमेदवारी

By admin | Updated: June 22, 2017 17:41 IST

काँग्रेसप्रणीत यूपीएकडून राष्ट्रपतीपदासाठी मीरा कुमार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 22 - काँग्रेसप्रणीत यूपीएकडून राष्ट्रपतीपदासाठी मीरा कुमार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मीरा कुमार यांची उमेदवारी जाहीर केली आहे. मीरा कुमार या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमधल्या एक आहेत. त्यांनी बिहार राज्यातून लोकसभेचं प्रतिनिधित्व केलं आहे. काँग्रेसच्या कार्यकाळात मीरा कुमार यांनी लोकसभेचं अध्यक्षपदही भूषवलं आहे. लोकसभा अध्यक्ष म्हणून त्यांची 3 जून 2009 रोजी बिनविरोध निवड झाली होती.मीरा कुमार दलित समाजाचं प्रतिनिधित्व करतात. त्या माजी उपपंतप्रधान जगजीवन राम यांच्या कन्या आहेत. मीरा कुमार या 1973मध्ये भारतीय परराष्ट्र सेवेत दाखल झाल्या. त्यांनी अनेक देशांची भ्रमंती केली आहे. त्यांच्या मातोश्री या स्वातंत्र्य सेनानी होत्या. लोकसभेवर त्या पाच वेळा निवडून गेल्या आहेत. त्या पेशानं एक वकील आणि मुत्सद्दी राजकारणी असून, 8व्या, 11व्या, 12व्या, 14व्या आणि 15व्या लोकसभेवर निवडून गेल्या आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या काळात त्यांनी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्रिपदही भूषवलं आहे. (राष्ट्रपतीपदासाठी भाजपाकडून रामनाथ कोविंद यांना उमेदवारी)तत्पूर्वी राष्ट्रपतीपदासाठी एनडीएकडून रामनाथ कोविंद यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रामनाथ कोविंद सध्या बिहारचे राज्यपाल आहेत. भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी पत्रकार परिषद घेत रामनाथ कोविंद यांचं नाव जाहीर केलं. भाजपाच्या संसदीय समितीच्या बैठकीत रामनाथ कोविंद यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. एनडीएच्या सर्व घटकपक्षांना ही माहिती देण्यात आल्याचं अमित शहा यांनी सांगितलं आहे. रामनाथ कोविंद 23 जूनला उमेदवारी अर्ज भरतील. "रामनाथ कोविंद मूळ उत्तर प्रदेशमधील कानपूरचे असून दलित प्रवर्गातले आहेत. संघर्ष करुन रामनाथ कोविंद आज या पदापर्यंत पोहोचले आहेत. रामनाथ कोविंद 12 वर्ष राज्यसभा सदस्य होते. उत्तर प्रदेशचे महासचिवदेखील होते". अशी माहिती अमित शहा यांनी दिली आहे. "नाव ठरण्याआधी आम्ही देशातील सर्व राजकीय पक्षांशी चर्चा केली होती. नाव ठरल्यानंतर एनडीएतील सर्व घटकपक्षांना कळवण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वत: काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांच्याशी बातचीत करत नाव कळवलं", असल्याची माहिती अमित शहा यांनी दिली आहे.